शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाण्यांसाठी व शेतातील माल वाहतूक करण्यासाठी अतिक्रमण मुक्त रस्ते लोक सहभागातून मोकळे करण्याचा वराेरा तहसील कार्यालयाचा यशस्वी प्रयत्न !
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : पाणंद रस्त्याचे काम खनिज विकास निधी सन – २०२१-२०२२ मध्ये मंजूर झालेले आहे. परंतु सदरहु पाणंद रस्त्यांची पाहणी केली असता कामाचे जागेवर शेतकऱ्यांनी माेठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याचे आढळुन आलेले आहे. त्यामुळे सदरहु पाणंद रस्त्यांवर (जागेवर) शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण हटवून देण्याची कार्यवाही मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच, सचिव यांनी केलेली आहे. त्याच अनुषंगाने दिनांक ११ नोव्हेंबर, २०२१ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक १६ मधील (ii) नुसार ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांची बैठक घेवून शेतकऱ्यांना समजावून सांगितले विशेष म्हणजे अतिक्रमण दूर करण्या बाबतची नियमात तरतूद आहे. त्यामुळे उक्त तरतुदी प्रमाणे कामाचे जागेवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण दूर करण्याबाबतची कार्यवाही दिनांक २४ जानेवारी, २०२२ पासून ते १६ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत तहसील कार्यालय, वरोराव्दारे कालबध्द कार्यक्रम पध्दतीने सुरु आहे.
आतापावेतो ३३ पाणंद रस्ते मोकळे करण्यात आले असून, यंत्रणेमार्फत माती काम व खडीकरणाचे काम सुरु झालेले आहे. उर्वरीत पाणंद रस्ते दिनांक १७ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत कालबध्द कार्यक्रमानुसार मोकळे करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरु आहे. या कामाबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाण्यांसाठी व शेतातील माल वाहतूक करण्यासाठी अतिक्रमण मुक्त रस्ते लोक सहभागातून मोकळे करण्याचा वराेरा तहसील कार्यालयाचा यशस्वी प्रयत्न !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 02, 2022
Rating:
