टॉप बातम्या

मा.अहेतेशाम अली यांचा हस्ते शिवजयंती निमित्य वरोरा शहरात विविध उपक्रम व कार्यक्रम

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 

वरोरा : आज दि.१९ फेब्रुवारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वरोरा शहरात मोठ्या थाटा माटात उत्साहात साजरी करत श्री.अहेतेशाम अली मा.नगराध्यक्ष न.प. यांच्या हस्ते युवा क्रांती सोशल क्लब तर्फे सर्वप्रथम शिवाजी चौक येथे राजे श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या नंतर ग्रामिण उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे महाराजांचा प्रतितिमेला माल्यार्पण करून रुग्नांचा तब्बेती ची विचारणा केली व फळ वाटप केले.

या वेळी ग्रूप चे अनिकेत नाकडे, राहुल आत्राम, निखिल श्रीरामे, नितेश मनुसमारे, प्रशित लोखंडे, आयुष मधुमटके, पराग तितरे, ईश्वर ठाकरे, सन्नी रामपुरे, अमन नायडू, वसंता गेडाम, आकाश धरने, दीपक लडी, शफीक शेख,निखिल चंदेल, अक्षय टेनपे, हाशिम अली, अनिकेत दातारकर, राजिक शेख, सतीश अड्डे, विकास बुरडकर, प्रथम बुरडकर, अभिजित चौधरी, अरहान सिद्दीकी, अरुण बावने, प्रतीक मुडे, आकाश गायकवाड उपस्थित होते. 
तसेच छावा ग्रूप तर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी रक्तदान शिबिरचे उदघाटन श्री.अहेतेशाम अली यांचा हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सर्वानी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले आणि रक्तदान शिबिराला सुरवात करण्यात आली.

या प्रसंगी कृषि उत्पन्न बाजार समिति सभापती राजुभाऊ चिकते, बोर्डा येथील सरपंच सौ.ऐश्वर्याताई खामनकर, ग्रामपंचायत सदस्य सौ.भोयर मॅडम सुधाकर कुंकुले, आकाश लिगाडे, राहुल नन्नावरे, निहाल मत्ते, समीर देठे, मंगेश पिजदुरकर, अमित नन्नावरे, अनिमेश रेड्डी, कपिल राऊत या सर्वांच्या उपस्थितीत शिवजयंती मोहत्सव साजरा करण्यात आला.
Previous Post Next Post