चिंचमंडळ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

चिंचमंडळ : कुळवाडी भुषण, बहुजनांचे प्रतिपालक, जाणते राजे, श्रीमंतयोगी, श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव शिवजन्मोत्सव समिती, चिंचमंडळ येथे साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ. वैशाली परचाके होत्या, प्रमुख अतिथी म्हणून श्री. खेकारे सर, (मुख्याध्यापक, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, चिंचमंडळ), श्री. जवादे सर (मुख्याध्यापक, जि. प. शाळा, चिंचमंडळ), श्री. प्रफुल विखनकर (उपसरपंच) व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर पाहुणे उपस्थित होते.

शैलेश कवाडे याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे रांगोळीतून सुंदर प्रतिमा साकारली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चौधरी सर यांनी केले, प्रास्ताविक गंभीर कवाडे तर आभार प्रदर्शन सौरव सातपुते याने केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शिवजन्मोत्सव समितीचे अतुल पचारे, अनिकेत झाडे, नितेश राऊत, वैभव सोनटक्के, शुभम पालकर, वासू विखनकर, निखिल शिवरकर यासंह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
चिंचमंडळ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव चिंचमंडळ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव Reviewed by सह्याद्री चौफेर on February 19, 2022 Rating: 5
Powered by Blogger.