सह्याद्री न्यूज | रवि घुमे
मारेगाव : विदर्भातील कोतवाल संघाची नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रसंगी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध प्रलंबित मागण्याच्या अनुषंगाने आंदोलन करण्याची भूमिका घेण्यात आली आहे.
या बैठकी दरम्यान, यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी असतांना संघटनेकरिता करत असलेल्या कार्याची दखल घेऊन वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी शशीकांत निमसटकर यांची विदर्भ कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
शनिवारी गुरुदेव सेवाश्रम सभागृह सुभाष रोड, नागपूर येथे विदर्भ कोतवाल संघाच्या वतीने विदर्भातील जिल्हाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, सचिव व कोतवाल बंधू यांची २८ फेब्रुवारी पासून होणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात आंदोलन करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आंदोलना संदर्भातील पुढील रुपरेषा आखण्यात आली व नियोजन करण्यात आले. या संदर्भातील विदर्भातील सर्व कोतवालानी सहमती दर्शवून जास्तीत जास्त कोतवाल बांधव आंदोलनात सहभागी असल्याची ग्वाही दिली.
या बैठकीला अध्यक्ष व बैठकीचे मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना फादर ऑफ बॉडी चे अध्यक्ष नामदेवराव शिंदे, महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे सरचिटणीस कृष्णा शिंदे विदर्भ कोतवाल संघांचे अध्यक्ष रवींद्र बोदिले अमरावती विभागीय कार्याध्यक्ष उत्तम पाचभाई विदर्भ कोतवाल संघाचे नवनियुक्त कार्याध्यक्ष यांनी आंदोलना संदर्भात पुढील आंदोलनाची दिशा ठरवून मार्गदर्शन केले.
तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे राजाभाऊ साठे,सुरेश शेलार यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित कोतवाल बांधवानी तसेच पदाधिकाऱ्यांनी शशिकांत निमसटकर यांच्या निवडी बद्दल अभिनंदन सह पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोतवाल संघटना यवमाळ जिल्ला अध्यक्ष शशिकांत निमसटकर यांची विदर्भ कार्याध्यक्ष पदी नियुक्ती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 07, 2022
Rating:
