टॉप बातम्या

वाघाने गायी वर केला हल्ला,स्थानिकात दहशतीचे वातावरण

सह्याद्री न्यूज नेटवर्क |

वणी : पिल्की वाढोना शेत शिवारात वाघाचा मुक्त संचार असल्याने जन सामान्यात दहशत निर्माण झाली आहे. या परिसरात एका गायी वर वाघाने हल्ला केला. महेश सुधारकर कोसारकर यांचे ते पशुधन आहे. रविवार दि.६ ला सुमारे साडे चार ते पाच वाजता च्या दरम्यान घटना उघडीस आली. त्यामुळे वाघाने पशुधनावर हल्ला चढविल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार नेहमी प्रमाणे जनावरे चराईसाठी गेल्या होत्या. अशातच वाघाने संधी साधून गायी वर पाठीमागून हल्ला केला हे गुराखी संतोष आत्राम यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मोठया हिंमतीने वाघाच्या तावडीतून पशुधनाचे प्राण वाचवले. मात्र, गाय या हल्यात जखमी झाली असल्याचे माहिती आहे. 
या शेतशिवारात वाघाचा मुक्त संचार असून पशुधनावर हल्ले सुरूच आहे. याकडे वन विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज असल्याचे बोलल्या जात आहे.

आज जनावर वर हल्ला चढवीला उद्या मानवावर होइल अशी शक्यता वर्तविली जात असून तशी चर्चा स्थानिकातून ऐकला मिळत आहे. 
मोल मजुरीचे दिवस असल्याने संबंधित विभागाने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष न करता, या मोकाट वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी शेतमजूरातून होत आहे.
Previous Post Next Post