सह्याद्री न्यूज नेटवर्क |
सूत्राच्या माहितीनुसार राहुल हा दोन दिवसापासून घरातून बेपत्ता होता, घरच्यांनी त्याचा शोध घेतला. मात्र, त्याचा थांगपत्ता कुठे लागला नाही. आज सोमवार रोजी दोन वाजताच्या दरम्यान, त्याचा गावातील एका विहिरीतच मृतदेह आढळून आल्याने ही आत्महत्या की घातपात? याबाबत वेगवेगळ्या चर्चा चर्चील्या जात आहे.
या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना देण्यात आली, घटनास्थळी पोलीस दाखल होताच मृत्यूदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला असून, वृत्त लिहिस्तोवर सदर घटने चा पंचनाम्याचे काम सुरु होते.
राहुल यांच्या पाठीमागे आई, वडील, एक मोठा भाऊ असा आप्त आहे.
२४ वर्षीय युवकाचा मृत्यूदेह गावातीलच विहिरीत आढळला!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 07, 2022
Rating:
