दोन मोटारसायकल एकमेकांना भिडल्या, एक ठार तर दोन जखमी

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन मोटारसायकल एकमेकास जोरदार भिडल्याने एक जन गतप्राण तर, दोघे जखमी झाल्याची अपघाती घटना आज सोमवारला साडेचार वाजताचे दरम्यान,मोठ्या पुलानजीक राज्य महामार्गावर घडली.

प्रकाश शेडमाके रा.मांगुरडा (३६) ता.झरी असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. तर शेख फहिम शेख मतीन, सय्यद इरफान सय्यद अनवर रा.आदीलाबाद असे जखमींची नावे आहे.

हे दोन्ही दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने जात असतांना दोन ट्रकला ओव्हरटेक करीत एकमेकास जबर धडक दिली. यात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर, जखमींना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पुढील तपास सुरू आहे.
दोन मोटारसायकल एकमेकांना भिडल्या, एक ठार तर दोन जखमी दोन मोटारसायकल एकमेकांना भिडल्या, एक ठार तर दोन जखमी Reviewed by सह्याद्री चौफेर on February 07, 2022 Rating: 5
Powered by Blogger.