सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
राजुर कॉलरी येथिल शामराव साखरकर यांची मुलगी बाळतपणासाठी माहेरी आली होती. 15 दिवसांपूर्वी तीने बाळाला जन्म दिला. आज गुरुवारी तीने माहेरीच गळफास लाऊन आत्महत्या केली. गौतमी मनोहर ताकसांडे (38) रा. पाथरी, सायखेडा असे या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या बाळतिनिचे नाव आहे. मुलीला जन्म देऊन 15 दिवसच झाले होते. आज अचानक सकाळी तीने वडिलांच्या राहत्या घरीच गळफास लाऊन जगाचा निरोप घेतला. 15 दिवसाच्या मुलीला सोडून आई कायमची निघुन गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. घटनेबाबत पोलिसांना माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. महिलेने आत्महत्या का केली, हे अद्याप कळू शकले नाही.
पुढील तपास पोलिस करित आहे.
बाळतिन महिलेचे गळफास घेऊन आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 10, 2022
Rating:
