डोल डोंगरगाव येथे शिक्षण परिषद संपन्न

सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : आज दि. 09.02.2022 रोजी हिवरा-मजरा व वरुड केंद्रांतर्गत जि.प.उच्च प्राथमिक शाळा, डोलडोंगरगाव येथे शिक्षण परिषद संपन्न झाली.

या परिषदेचे उद्घाटन श्री.अनिलजी राऊत गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मारेगाव यांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी सौ. रुपाली गुरनुले उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती डोलडोंगरगाव ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून रमेशजी आष्टोणकर सदस्य शाव्यस, श्रीमती चंद्रकला कोसळे सदस्य, हनुमान टोंगे सदस्य, जितेंद्र मोहुर्ले सदस्य, सौ. रिता राजगडे सदस्य चंद्रभान ढवळे सदस्य, गुरुदास अतकर, श्री. निलेश आत्राम साधनव्यक्ती बीआरसी मारेगाव, श्री.दिलीप भगत मु.अ.जि.प.उ.प्रा.शाळा डोलडोंगरगाव उपस्थित होते.

याप्रसंगी श्री अनिलजी राऊत गटशिक्षणाधिकारी प. स. मारेगाव यांचा शाल व श्रीफळ देवून ज्येष्ठ शिक्षक खुशालजी काळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सतत प्रयत्नशील असावे. वेळेवर शाळेत जावे,शिक्षण परिषदेची व्याख्या. विविध उपक्रम वर्ग स्तरावर राबविण्यात यावे. कोरोना 19 मुळे मागे पडलेले विद्यार्थी शैक्षणिक दृष्टीने पुढे जातील. इंग्रजी विषयाची भीती वाटू नये म्हणून टॅग सभेत सक्रिय सहभाग घ्यावा. निपुन भारत अभियान निष्ठा प्रशिक्षण 3.0 इत्यादी विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. 
सौ. रुपाली गुरनुले उपाध्यक्ष शा व्य स डोलडोंगरगाव यांनी अध्यक्षीय भाषणातून शिक्षण परिषदेला शुभेच्छा दिल्या. 
 
शिक्षण परिषदेच्या नियोजन व वेळापत्रकानुसार श्री. बाबाराव ढवस केंद्रप्रमुख वरुड निपुण भारत अभियान 27 आँक्टोबर 2021 च्या जी. आर. चे सखोल वाचन व चर्चा घडवून आणली, निष्ठा प्रशिक्षण, एन ई पी 2020 समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विविध भौतिक सुविधा व प्रशासकीय विषयावर मार्गदर्शन व चर्चा केली. ऑनलाईन व ऑफलाईन उपक्रम याविषयी चर्चा करुन मार्गदर्शन केले. 
श्री. निलेश आत्राम साधनव्यक्ती मारेगाव यांनी भाषासंगम विषयावर मार्गदर्शन केले तसेच राज्य स्तरावर राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. संदिप डहाके सर यांनी भाषा पेटी उपयोग व साहित्य चा वापर कसा करावा याविषयी सविस्तर कृतीयुक्त मार्गदर्शन केले. श्री शैलेश राऊत सरांनी गणित पेटी विषयी मार्गदर्शन केले. केंद्रप्रमूख चटप सर व ढवस सर यांनी प्रशासकीय बाबीचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे संचालक श्री. संदिप डहाके सरांनी केले. प्रास्ताविक श्री. अशोक चटप केंद्रप्रमुख हिवरा मजरा यांनी तर आभार प्रदर्शन रविकांत मडावी सर यांनी मानले. शिक्षण परीषदेच्या यशस्वितेकरीता शाळेचे मु.अ. दिलीप भगत सर, खुशाल काळे सर, रविकांत मडावी सर व संदिप डहाके सर यांनी सहकार्य केले. 

अशाप्रकारे अतिशय आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण परिषदेची सांगता झाली. अशी माहिती बाबाराव ढवस केंद्रप्रमुख वरुड यांनी दिली.
डोल डोंगरगाव येथे शिक्षण परिषद संपन्न डोल डोंगरगाव येथे शिक्षण परिषद संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on February 10, 2022 Rating: 5
Powered by Blogger.