सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
हिंगणघाट : समजात या घटना किळस निर्माण करणाऱ्या आहे. आरोपी दोषी आहे आणि त्यांनी केलेला गुन्हा हा असाधारण आहे. आज जर अशा लोकांना समाजाने आणि न्यायालयाने धडा शिकवला नाही तर अशा घटनांना बळ मिळते व दबाव राहत नाही. त्यामुळे गुन्हेगारीची भीती निघून जाईल व गुन्हेगारी व महीला अत्याचाराचे प्रमाण वाढेल.
समाजात स्त्रियांचे व मुलींचे या महाराष्ट्रासारख्या नावलौकिक आणि सुसंस्कृत राज्यात बाहेर निघणे कठीण होईल असे चित्र समाजासमोर उभे झाल्या शिवाय राहणार नाही. तूर्तास अंकिता जळीत कांड मध्ये हिंगणघाट न्यायालयाने योग्य निर्णय दिला. प्रख्यात वकील उज्वल निकम यांनी मनापासून या प्राकरणावर मेहनत घेवुन विकेश नगराळे चा आरोप सिद्ध करून प्राध्यापिका अंकीताला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. अंकिताचा संपूर्ण परिवाराच्या मी रोज सानिध्यात आहे. तिच्या आई वडिलांना एकच आशा लागलेली आहे माझा पोरीला बस न्याय मिळावा म्हणून ते मला रोज फोन करून विचार पुस करतात. अंकिताची आई आजही फार मोठ्या सदम्यात आहे. ही घटना २ वर्षापूर्वी नाही तर आत्ताच तिच्या डोळ्यासमोर तिच्या मुलीला त्या नराधमाने पेट्रोल टाकून जाळले असावे आणि माझी मुलगी परत येणार अशी ती दिव्यासारखी मुलीची वाट आजही बघत आहे हे बघून मन सुन्न होते.
आज अंकिता पिसुद्दे जळीत कांड प्रकणात आरोपीस आजीवन कारावासाची शिक्षा झाली या अनुषंगाने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचे महारष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या मंगला ठक यांनी आभार मानले.
अंकिता पिसुद्दे जळीत कांड प्रकणात आरोपीस आजीवन कारावासाची शिक्षा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 10, 2022
Rating:
