टॉप बातम्या

काेरपना येथे फेरफार अदालतला शेतकरी व नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : कोरपना तालुक्यात दि. ९ फेब्रुवारीला नागपूर महसुल आयुक्त प्राजक्ता लवंगारे -वर्मा यांचे दि.१३ जानेवारी २०२२ च्या आदेशीय पत्रकानुसार तहसील कार्यालय कोरपना येथे "फेरफार अदालत" घेण्यात आले. यात तालुक्यांतील १३ तलाठी व २ मंडळअधिकारी सहभागी झाले हाेते. या अदालत मध्ये
फेरफार संदर्भात माेठ्या प्रमाणात नागरिक व शेतकरी बंधू सुध्दा उपस्थित झाले हाेते. उपराेक्त मोहिमेची व्यापक अशी तालुकास्तरावर प्रसिद्धी देखिल देण्यात आली होती. एव्हढेच नाही सोशल मीडियाद्वारे सुद्धा या फेरफार अदालतचा प्रचार करण्यात आला होता.
सदरहु अदालत मध्ये,डीएसडी (DSD), ई-पीक पाहणी व नियंत्रित सत्ता प्रकार व सर्व प्रकारचे ऑनलाइन प्रलंबित फेरफार नोंदी, व वारस नोंदी निकाली काढण्यात आल्या तसेच तलाठी आणि मंडळ अधिकारी स्तरावरील ऑनलाइन प्रणालीतून होणारी कामे तहसीलदार यांचे मान्यतातुन पार पाडण्यात आली.

या शिवाय शेतकरी बांधवाची कामे सुद्धा जल्द गतीने करण्यांत आली. कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करुन ही अदालत पार पडली. अश्या फेरफार अदालत जिल्ह्याच्या तालुकास्तरावर वेळाेवेळी झाल्यास जनतेचे काम वेळेवर होईल व त्वरीत त्यांचे कामाचा निपटारा होईल,अशी अपेक्षा अनेकांनी या वेळी व्यक्त केली.
    
उपरोक्त फेरफार अदालत करण्याची जबाबदारी काेरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर कोरपनाचे मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, गडचांदुरचे मंडळ अधिकारी नारायण चव्हाण, व डीबीए (DBA) म्हणून विरेंद्र मडावी यांनी अचुकपणे पार पाडली आयाेजित फेरफार अदालतला संपुर्ण तलाठी व काेरपना तहसीलचे कर्मचारी उपस्थित हाेते.
Previous Post Next Post