घोडदरा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज्यांच्या पुतळ्याचे अनावरण

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्यातील घोडदरा येथे गुरुदेव भजन मंडळा च्या वतीने हनुमान देवस्थान येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

या अनावरण प्रसंगी पंढरपूरचे बोढाले महाराज यांच्या अध्यक्षतेखालील अनावरण सोहळा पार पडला. त्यानिमित्त मंडळाचे अध्यक्ष रमेश गोचे, अनिल रोगे, संजय देवकर, दत्ता दुमोरे, सोमा पायघन, प्रभाकर हिवरकर, यांनी अथक परिश्रम घेऊन गावात प्रार्थना व मुलांना गुरु मार्गाला लावले. त्यांचे समस्त गुरुदेव मंडळाचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे. या निमित्ताने गावातील तरुण वर्ग व्यसन मुक्तीकडे वाटचाल करीत आहे.

असेच कार्य मंडळा तर्फे घडो, हीच गुरुदेव चरणी प्रार्थना असे दयाल रोगे यांनी सांगितले.
Previous Post Next Post