सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वेकोलीचे सुरक्षा कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षादलाच्या जवानांना हे दोन्ही ट्रक उकणी कोळसाखाणीतून चोरटया मार्गाने कोळशाची चोरी करतांना आढळून आले. सुरक्षा दलाच्या जवानांनी कोळसा चोरी करणारे दोन्ही ट्रक पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यावरुन आता कोळसा माफियांचे रात्रीचे खेळ सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
उकणी कोळसा खदानीतून निघणारा कोळसा हा उच्च प्रतीचा असल्याने कोळसा उद्योजक उकणीच्या कोळशाला प्रथम पसंती देतात. कोल माफियांची नजरही याच कोळसाखाणीवर जास्त असते. दोन वर्षांपूर्वी कोळसाखाणीतून कोळसा चोरीचे प्रकार वाढल्याने कोळसा चोरी रोखण्याकरिता वेकोली सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या दिमतीला एमएसएफ चे जवान कोळसाखाणींमध्ये तैनात करण्यात आले. या बंदुकधारी जवानांनी कोळसा चोरीवर रोख लावतांनाच कोल माफीयांना "सळो की पळो" करुन सोडले. परंतू आता कोल माफीयांनी परत डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. कोळशाच्या वाढलेल्या वाहतुकीचा कोल माफिया देखील फायदा उचलू लागले आहेत. उकणी कोळसाखाणीतून चोरटया मार्गाने कोळसा चोरी करण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला आहे. भालर मार्गे कच्चा रस्त्याने उकणी गावातून कोळसा खदानीत ट्रक नेऊन मोठ्या शिताफीने कोळसा चोरीचा या चोरट्यांनी डाव आखला आहे. पण एमएसएफ जवानांच्या नजरेतून ते वाचू शकले नाहीत. या मार्गाने कोणतेही चेकपोस्ट नसल्याने सहज कोळशाची चोरी करता येईल, असे या चोरटयांना वाटले. उकणी कोळसाखाणीतून कोळसा भरुन ट्रक भालर मार्गे वणीला जात असल्याचे समजताच सुरक्षा जवानांनी कोळसा चोरी करणारे हे ट्रक पकडले, व ट्रक चालकांना ताब्यात घेतले. त्यानंतर ठाणेदार श्याम सोनटक्के यांना महीती देऊन दोन्ही ट्रक व आरोपी त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी MH 49 AT 9192 व MH 40 AK 5291 हे दोन्ही ट्रक ताब्यात घेऊन सात आरोपींना अटक केली. यामध्ये अश्फाक, राजू रामन्ना चित्तलवार (38) रा. महादेव नगर चिखलगाव, रोहन वरारकर, अरविंद विजय भोयर (41) रा. मोहदा, धिरज रामकृष्ण मडकाम (47) रा. डोर्ली, हर्शल रमेश लोहबळे (31) रा. रंगनाथ नगर, स्वप्निल पांडूरंग नागपुरे (30) रा. रामपुरा वार्ड यांचा समावेश असुन यांच्यासह जितेंद्र सिंह उर्फ कालू संजन सिंह (39) रा. भालर कॉलनी, धनराज मंगल येसेकर (39) रा. गणेशपूर, राजू केसेकर रा. राजुर कॉलरी व तिन अज्ञात आरोपींविरुध्द भादंवि च्या कलम 307, 395, 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कार्यवाहीत पोलिसांनी दोन ट्रक किंमत 24 लाख रुपये, 40.970 टन कोळसा किंमत 2 लाख 25 हजार 335 रुपये असा एकुण 26 लाख 25 हजार 335 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोळसा चोरी करणारे ट्रक अडविणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या अंगावर चोरटयांनी ट्रक चढविण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकाच्या तक्रारी वरुन पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटिल भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, सपोनि माया चाटसे, पोउपनि प्रविण हिरे, पोना संतोष अढाव, पोलिस अमलदार विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली.
उकणी कोळसाखाणीतून कोळसा चोरी करणारे दोन ट्रक पकडले, सात आरोपींना केली अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 10, 2022
Rating:
