सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी जमानी : झरी जामणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या निबादेवी येथे ग्रामपंचायत मध्ये पंतप्रधान आवास घरकूल योजना ही यादी आली आहे. मात्र निबादेवी येथील ग्रामस्थांनी नवीन बेस यादी मध्ये छेडछाड करून अनुक्रमांकाचे नाव खाली वर करण्यात आले आहे अशी तक्रार निंबादेवी येथील लाभार्थी यांनी गट विकास अधिकारी यांना दिली आहे.
पंतप्रधान आवास घरकुल योजना लाभार्थी यांना घरकूल आले असून त्यामध्ये नवीन बेस यादी नुसार ग्रामपंचायती मध्ये प्राप्त झाली, असून ग्रामसेवक सरपंच व उपसरपंच यांनी त्या यादीला छेडछाड करून खालचे नाव वर व वरचे नाव खाली करून सर्व त्यांच्या संबंधित लाभाथाचे नावे वर समाविष्ठ करण्यात आले आहे.
प्रथम अनुक्रमांका वरील सर्व प्राप्त लाभार्थी यांचे नाव शेवटच्या क्रमांकावर असून हे भूमिहीन ,अल्पभूधारक लाभार्थी आहे. त्यामुळे यांना नवीन घरकुल यादी मान्य नसून बेस यादी नुसार घरकुल देण्यात यावे अशी मागणी पंचायत समिती गट विकास अधिकारी याना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
निंबादेवी ग्रामस्थांनी दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 11, 2022
Rating:
