नेहरू युवा केंद्र यवतमाळ आणि संघर्ष क्रीडा मंडळ केगांव यांच्या वतीने कबड्डी सामन्याचे आयोजन

सह्याद्री न्यूज : कुमार अमोल 

मारेगाव : नेहरू युवा केंद्र यवतमाळ आणि संघर्ष क्रीडा मंडळ केगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 ते 7 फेब्रुवारी 2022 दोन दिवसीय कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जवळपास 32 संघांनी सहभाग नोंदवला होता.

झालेला रंगतदार कबड्डी सामन्यात प्रथम क्रमांक संघर्ष क्रीडा मंडळ केगाव द्वितीय क्रमांक जय हिंद क्रीडा मंडळ मारेगाव, तृतीय क्रमांक जय पेरसापेन क्रीडा मंडळ वागदरा या संघाने पटकावला तसेच लांब उडी, गोळा फेक आणि शंभर मीटर रनिंग या स्पर्धासुद्धा घेण्यात आल्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, दिनकर पावडे (ज्येष्ठ भाजपा नेते) संजय पिंपळशेंडे (सभापती पंचायत समिती वणी) शंकर लावणारे (जिल्हा सचिव भाजप) ज्ञानेश्वर चिकटे (तालुकाध्यक्ष भाजप) आणि गावातील प्रमुख मान्यवर यांची उपस्थिती होती. खेळाचे परीक्षक म्हणून माननीय राठोड सर, विनोद ठावरी, अजय वाघाडे, अमित दुर्गे, राजू मरस्कोल्हे, मोहन पायघन इत्यादी होती.

विजय संघाच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम माननीय संजय भाऊ देरकर (उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ) यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. प्रमुख मान्यवर म्हणून जितु भाऊ नगराळे, (नगरसेवक मारेगाव) मोहिते सर, खानझोडे सर, आणि गावातील नागरिक उपस्थित होते विजयी संघांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि मेडल देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन पायघन तर आभार प्रदर्शन राजू मरसस्कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहरू युवा केंद्राचे पदाधिकारी आणि संघर्ष क्रीडा मंडळ केगावच्या सदस्यांनी सहकार्य केले आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
नेहरू युवा केंद्र यवतमाळ आणि संघर्ष क्रीडा मंडळ केगांव यांच्या वतीने कबड्डी सामन्याचे आयोजन नेहरू युवा केंद्र यवतमाळ आणि संघर्ष क्रीडा मंडळ केगांव यांच्या वतीने कबड्डी सामन्याचे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on February 11, 2022 Rating: 5
Powered by Blogger.