म्हैसदोडका येथे शिक्षण परिषद संपन्न



सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : दि. 09.02.2022 रोजी नवरगांव-हटवांजरी केंद्रांतर्गत नेताजी सु.बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हैसदोडका येथे शिक्षण परिषद संपन्न झाली.

या परिषदेचे उद्घाटन सन्मा.श्री. हरीष दरबेशवार मु.अ. सराटी पंचायत समिती मारेगाव यांनी केले..परिषदेच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.रविंद्र देवाळकर संस्था सचीव नेताजी सु.बोस विद्यालय म्हैसदोडका हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.योगेश वेले मुख्याध्यापक नेताजी विद्यालय म्हैसदोडका, श्री.बोढे सर मु.अ.जि.प. शाळा सगणापूर, घुमणर मॅडम - विषय साधनव्यक्ती, सेलोटकर मॅडम - विषय साधनव्यक्ती, याप्रसंगी सन्मा. श्री अनिलजी राऊत गटशिक्षणाधिकारी प. स. मारेगाव यांचा शाल व श्रीफळ देवून मा.श्री वेले सर मुख्याध्यापक नेताजी विद्यालय म्हैसदोडका यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सतत प्रयत्नशील असावे. वेळेवर शाळेत जावे,शिक्षण परिषदेची व्याख्या. विविध उपक्रम वर्ग स्तरावर राबविण्यात यावे. कोरोना 19 मुळे मागे पडलेले विद्यार्थी शैक्षणिक दृष्टीने पुढे जातील. इंग्रजी विषयाची भीती वाटू नये म्हणून टॅग सभेत सक्रिय सहभाग घ्यावा. निपुन भारत अभियान निष्ठा प्रशिक्षण 3.0 इत्यादी विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मा.श्री.देवाळकर सर यांनी अध्यक्षीय भाषणातून शिक्षण परिषदेला शुभेच्छा दिल्या.

शिक्षण परिषदेच्या नियोजन व वेळापत्रकानुसार श्री. लांजेवार सर केंद्रप्रमुख हटवांजरी यांनी निपुण भारत अभियान 27 ऑक्टोबर 2021 च्या जी. आर. चे सखोल वाचन व चर्चा घडवून आणली, निष्ठा प्रशिक्षण, एन ई पी 2020 समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विविध भौतिक सुविधा व प्रशासकीय विषयावर मार्गदर्शन व चर्चा केली. ऑनलाईन व आँफलाईन उपक्रम याविषयी चर्चा करुन मार्गदर्शन केले. 

मा.घुमनर मॅडम विषय साधनव्यक्ती मारेगाव यांनी भाषासंगम विषयावर मार्गदर्शन केले तसेच राज्य स्तरावर राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. 
श्री.मलकापुरे सर यांनी भाषा पेटी उपयोग व साहित्य चा वापर कसा करावा याविषयी सविस्तर कृतीयुक्त मार्गदर्शन केले. श्री. होटे सरांनी गणित पेटी विषयी साहित्यासह कृतीयुक्त मार्गदर्शन केले. 

केंद्रप्रमूख श्री.मारबते सर व श्री. लांजेवार सर यांनी प्रशासकीय बाबीचा आढावा घेतला..याप्रसंगी तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत द्वितीय क्रमांक आल्याबद्दल नवरगांव केन्द्रातील कु.सुजाता मेश्राम यांचा कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन श्री.काळे सर नेताजी विद्यालय म्हैसदोडका यांनी केले. प्रास्ताविक श्री. लांजेवार सर केंद्रप्रमुख हटवांजरी यांनी तर आभार श्री. मारबते सर केन्द्रप्रमुख नवरगांव यांनी मानले. शिक्षण परीषदेच्या यशस्वितेकरीता शाळेचे मु.अ.श्री.वेले सर, राठोड सर, काळे सर, पुनवटकर सर, कवाडे सर, चाफेकर सर, लोंढे सर व विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले. 

अशाप्रकारे अतिशय आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण परिषदेची सांगता झाली. 
अशी माहिती श्री.मारबते सर केंद्रप्रमुख नवरगांव, श्री.लांजेवार सर केंद्रप्रमुख हटवांजरी यांनी दिली.


म्हैसदोडका येथे शिक्षण परिषद संपन्न म्हैसदोडका येथे शिक्षण परिषद संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on February 11, 2022 Rating: 5
Powered by Blogger.