सह्याद्री न्यूज | रवि घुमे
मारेगाव : नगराध्यक्ष पदाकरीता प्रमुख विजयी पक्षाकडून केवळ तीन अर्ज दाखल दाखल झाल्यामुळे सामान्य जनतेच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. कांग्रेस पक्षातर्फे नंदेश्वर खुशाल आसुटकर, शिवसेनेतर्फे मणिष तुळशीराम मस्की तर भाजप कडून हर्षा अनुप महाकुलकार यांनी अर्ज दाखल केले.
कांग्रेस ने अपक्षाला हाताशी धरून स्वतःचे संख्याबळ सहा केले तर भाजप ही मनसेचा आधार घेऊन बड्या पक्षासोबत सत्तास्थापनेसाठी कंबर कसून आहे. भाजप सेना मिळून आठ संख्याबळ झाले तरी सत्तास्थापने शक्य नाही,मदार आहे ती मनसे वर. यात मनसे ची भुमिका लक्षवेधी ठरणार आहे. जर आघाडीत बिघाडी आली तर "जीधर मनसे उधर सरकार" अशी परिस्थिती निर्माण होईल. अर्थात किंगमेकर च्या भुमिकेत मनसेच असेल.
शहरात पक्षांच्या गुप्त बैठका व कुजबुजांचा अंदाज आघाडीत बिघाडी झाल्याचेच दर्शवत आहे,पण स्थानिक राजकारणात कुठलेच आराखडे बांधता येत नाही हे खरे.
मारेगांव न.पं.सत्तास्थापनेचा तिढा: आघाडीत बिघाडी येण्याची खमंग चर्चा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 11, 2022
Rating:
