लोकशाही पंधरवाडा : मतदारांना कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय मतदार दिन : डॉ. तानाजी माने

सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग व NSS विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या आदेशानुसार, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्यावतीने 'लोकशाही पंधरवाडा' विषयावर आधारित मतदार जनजागृती व अधिकार यावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

प्रस्तुत कार्यक्रमास उपस्थित डॉ. तानाजी माने, राज्यशास्त्र विभागप्रमुख, लोकमान्य महाविद्यालय, वरोरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि देशाच्या मतदारांच्या एकूण संख्येत तरुण वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तरुणांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिकाधिक सहभागी होऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या लोकशाहीच्या मूल्यांना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यातूनच भारताची लोकशाही अखंड राहील.

मतदान प्रक्रियेत मतदारांचा जास्तीत जास्त सहभाग नोंदवणे, तसेच देशासाठी योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदारांना मतदानाबद्दल जागृत करणे हे राष्ट्रीय मतदार दिनाचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी तसेच देशात निष्पक्ष निवडणुका घडवून आणून भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाचे ही महत्त्वपूर्ण योगदान आहे. आपल्या आध्यक्षीय भाषणात बोलत असताना प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांनी लोकशाहीत मताला स्वतःचे महत्त्व आहे. कोणत्याही लोकशाही देशात सरकार बनवण्यात सर्वसामान्य जनतेची म्हणजेच मतदारांची सर्वात मोठी भूमिका असते. मतदान करणे हा प्रत्येक जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉ. गजानन सोडणर, इतिहास विभागप्रमुख यांनी भारतीय संविधानाने मतदारांना दिलेला मतदानाचा हक्क खुप अनमोल आहे. त्यामुळे आपल्या मतदानाचा हक्क सुज्ञपणे वापरून देशाला विकासाच्या मार्गावर वर घेऊन जाण्यासाठी आणि देशाची प्रगती साधण्यासाठी प्रत्येक मतदारांनी जागृत झाले पाहिजे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख यांनी केले तर सूत्रसंचलन डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्यक्रम अधिकारी प्रा. भगत सर, प्रा. शेंडे मॅडम यांनी योगदान दिले व मोठ्या संख्येने रासेयो विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन डॉ. विभा घोडखांदे यांनी मानले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. चव्हाण सर डॉ. चिरडे सर, डॉ. अडसरे सर, प्रा. जेणेकर सर, प्रा. आत्राम सर, प्रा. भांदकर मॅडम शिक्षेकत्तर कर्मच्यारी अभिजित पंढरपूरे , आकाश कुमरे आदि आवर्जून उपस्थित होते.
लोकशाही पंधरवाडा : मतदारांना कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय मतदार दिन : डॉ. तानाजी माने लोकशाही पंधरवाडा : मतदारांना कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय मतदार दिन : डॉ. तानाजी माने Reviewed by सह्याद्री चौफेर on February 11, 2022 Rating: 5
Powered by Blogger.