चंद्रपूरात शिवजयंती निमित्त यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने बाईक रॅली, रॅलीने अनेकांचे लक्ष वेधले !
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : शिवजयंती निमित्त आज शनिवारी यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिलांनी पांरपारिक वेशभुषा परिधान करुन सदरहु रॅलीत सहभाग घेतला.
विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. तदवतचं यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन देखिल करण्यात आले होते. यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयातून निघालेली बाईक रॅली शिवरायांचा जयघोष करीत शहराच्या मुख्य मार्गाने होत जटपूरा गेटला वळसा घालून परत ती रँली यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात पोहचली. त्यानंतर शिव छत्रपती महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन त्यांना मानवंदना करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या सायली येरणे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, दुर्गा वैरागडे, सविता दंडारे, वैशाली मेश्राम, स्मिता वैद्य, आशु फुलझले, कौसर खान, विमल काटकर, शमा काजी, अल्का मेश्राम, अनिता झाडे, निलिमा वनकर यांची उपस्थिती होती.
चंद्रपूरात शिवजयंती निमित्त यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने बाईक रॅली, रॅलीने अनेकांचे लक्ष वेधले !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 19, 2022
Rating:
