चंद्रपूर आपच्या पदाधिका-यांनी घेतली नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरेंची भेट


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : आज शनिवार दिनांक 19 फेब्रूवारीला राज्याचे नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे हे प्रशासकिय कामानिमित्याने चंद्रपुर दाै-यावर आले होते. दरम्यान आपच्या चंद्रपुर टीम ने नगर विकास मंत्री यांना वेळ मागत त्यांनी त्यांची भेट घेतली.

मनपा अंतर्गत असलेल्या वडगाव प्रभाग मधील झालेल्या कामाची निविदा काढून 1 करोड रुपये लाटण्यांचा (सत्ताधा-यांचा) प्रयत्न आप ने हानुन पाडला आहे. याच विषयाच्या अनुषंगाने पदाधिका-यांनी मंत्री महाेदयाशी चर्चा केली व दोषींवर कडक कार्यवाही व्हावी या साठी नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांना या वेळी एक लेखी निवेदन सादर केले.
 
निवेदन देतांना आपचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे युवा जिल्हाध्यक्ष मयूर राइकवार, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, सोशल मिडिया हेड राजेश चेडगुलवार, महानगर सचिव राजू कुडे, महानगर उपाध्यक्ष सिकन्दर सागोरे, सुनील सदभैया, कालिदास आरके, ऋग्वेद राइकवार, निखिल बारसागडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. उपरोक्त प्रकरणात याेग्य चाैकशी करू असे आश्वासन नगर विकास मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी आपच्या पदाधिका-यांना या वेळी दिले.
 
सध्या मनपाचे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.
चंद्रपूर आपच्या पदाधिका-यांनी घेतली नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरेंची भेट चंद्रपूर आपच्या पदाधिका-यांनी घेतली नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरेंची भेट Reviewed by सह्याद्री चौफेर on February 19, 2022 Rating: 5
Powered by Blogger.