सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : विदर्भ आंदाेलनाच्या तयारीसाठी काल रविवार दि.१३फेब्रुवारी दुपारी येथील स्थानिक श्रमिक पत्रकार भवनात एक आढावा बैठक पार पडली. उपराेक्त बैठकीचे आयोजन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आले हाेते.
सदरहु बैठकीला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा राजूराचे भूतपूर्व आमदार वामनराव चटप, दैनिक दैशाेन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पाेहरे, विदर्भ महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना मामर्डे, माजी विधानसभा उपसभापती माेरेश्वर टेभूर्डें, माजी मंत्री डॉ रमेश गजभे, विदर्भ प्रदेश युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, अरुण केदार व अन्य पदाधिकारी उपस्थित हाेते.
या वेळी माजी आमदार वामनराव चटप व प्रकाश पाेहरे यांचेसह इत्तरांनी बैठकीला संबाेधित केले.
विदर्भ आंदाेलनाच्या तयारीसाठी चंद्रपूरात पार पडली महत्वपूर्ण बैठक !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 14, 2022
Rating:
