सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : वेकोलिच्या उकणी कोळसाखाणीतील कोळसा चोरी प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायायालयात हजार करण्यात आले. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनविन्यात आली आहे. तसेच आधी अटक केलेल्या सात आरोपींचा दोन दिवसांच्या पीसीआरचा कालावधी संपल्याने त्यांनाही आज न्यायालयात हजार करण्यात आले. न्यायाधीशांनी त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करून आठही आरोपींना १६ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उकनी कोळसाखाणीतील कोळसा तस्करी प्रकरणात एकूण १३ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पर्यंत आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून कोळसा तस्करीत सहभागी असलेल्या त्यांच्या साथीदारांची माहिती मिळविण्याचा पोलिस कसोशीने प्रयत्न करित आहे. ९ फेब्रुवारीला मध्यरात्री उकणी कोळसा खाणीतून कोळसा तस्करी करणारे दोन ट्रक व सात तस्करांना वेकोलि सुरक्षा रक्षक व महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफीने पकडले. तस्करांनी सुरक्षा रक्षकांच्या अंगावर ट्रक चढविण्याचा प्रयत्न केला, पण एमएसएफ जवानांनी जीवाची बाजी लावून त्यांचा कोळसा तस्करीचा डाव उधळून लावला. कोळसा चोरी करणारे ट्रक पकडल्याची माहिती ठाणेदार श्याम सोनटक्के यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. कोळसा भरलेले दोन ट्रक व सात तस्करांना ताब्यात घेऊन वणी पोलिस स्टेशनला आणले. ११ फेब्रुवारीला त्यांना न्यायालयात हजार केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान काल कोळसा चोरी प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याला व पोलिस कोठडीची मुदत संपलेल्या सात आरोपींना आज न्यायालयात हजार केले असता न्यायाधीशांनी त्यांची १६ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी वाढवून दिली. अटकेतील आरोपींची कसून चौकशी केली जात असून कोळसा तस्करीतील मोठे मासे गळाला लावण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहे. पोलिसांनी कोळशाची चोरी करणाऱ्या दोन्ही ट्रकमध्ये कोळसा भरणारा लोडर ऑपरेटर संजय देवसरन केवट (३६) रा. भांडेवाडा कॉलनी याला काल अटक केली. कोळसा चोरी करणाऱ्या ट्रकांमध्ये कोळसा भरून देत चोरीचा भागीदार बनलेल्या या लोडर ऑपरेटरला पोलिसांनी ताब्यात घेतले. कोळसा तस्करीत आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा उलगडा करण्याचा पोलिस सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. या कोळसा चोरी प्रकरणाचा तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे करीत आहे.