सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी : आज उपविभागात नगर पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. झरी, मारेगाव नगराध्यक्ष पदासाठी सोमवारी निवडणूक झाली. त्यात नगर पंचायत अध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेने आपले उमेदवार अध्यक्ष पदावर विराजमान झाले तर झरी येथे जंगोमने उपाध्यक्ष पदी बाजी मारली तर मारेगाव नगरपंचायत मध्ये भाजप चा उमेदवार उपाध्यक्ष पदी. त्यामुळे उपविभागात शिवसैनिकात आनंदाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे भाजप व काँग्रेसचे बाहुबल्य असलेल्या झरी येथे शिवसेनेची ही कामगिरी मोठी मानली जात आहे. तीच कामगिरी मारेगाव येथेही पाहायला मिळाली. झरी नगर पंचायतीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे ज्योती बिजगूनवार तर प्रथमच सत्तेत आरूढ झालेले जंगोमचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोडापे हे विजयी झाले.
सगळ्यांचे लक्ष लागलेले मारेगाव नगर पंचायतीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे डॉ मनिष मस्की तर उपाध्यक्ष पदी हर्षा महाकुलकर (भाजप) ह्या ईश्वर चिट्ठीने विजयी झाल्या. अत्यंत चुरशीच्या नगर पंचायत अध्यक्ष निवडणुकीत शिवसेना सत्तेत बसली. परंतु काँग्रेस अधिक मताने असून सुद्धा सत्तेबाहेर राहिली. हा चर्चेचा विषय ठरला. शिवसेनेने नगर पंचायतींमध्ये मिळवलेले हे यश भविष्यात भाजप आणि काँग्रेसला धक्कादायक ठरले आहे.
या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दिवस-रात्र एक करून ही आपला जलवा दाखवू शकली नाहीत. त्यामुळे भविष्यात काँग्रेस ला उपविभागात चिंतनाची गरज आहे.
नगर पंचायत अध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 14, 2022
Rating:
