मार्डी प्रा आरोग्य केंद्रात डॉक्टर रजेवर, रुग्ण वाऱ्यावर; ओपीडी पुरते तात्पुरत्या डॉक्टर ची सोय

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
      
मारेगाव : तालुक्यातील मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय रजेवर गेल्याने सध्या या प्रा. आ.केंद्राकरिता डॉक्टरच नाही केवळ ओपीडी पुरतीच तात्पुरत्या डॉक्टरची सोय केली आहे मात्र, इतर वेळेत डॉक्टरच नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. 
          
मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत मार्डी, चिंचमंडळ, चोपण, मजरा, हिवरा, मछिंद्रा, जळका, कुंभा, बोटोणी, अशी नऊ उपकेंद्र आहेत या मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ५८ गावातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविली जातात मात्र या आरोग्य केंद्रास रिक्त पदांचा वानवा आहेत येथील प्रा. आरोग्य केंद्रास दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत त्यापैकी एक वैदयकीय अधिकारी वैद्यकीय रजेवर तर दुसरे पद रिक्त असल्याने डॉक्टरचे पद सुद्धा रिक्त आहेत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपाची ओ पी डी करिता तात्पुरत्या दोन डॉक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. या डॉक्टरांनी आठवड्यातील तीन तीन दिवस ओपीडी करिता वाटून घेतले आहेत. रविवार मात्र, यातून वगळला आहे अत्यावश्यक असलेली आरोग्य सेवा २४ तास असणे अपरिहार्य आहेत ग्रामीण भागातील नागरिक रात्री बेरात्री उपचाराकरिता येत असतात परंतु येथे डॉक्टरच नसल्याने हे आरोग्य केंद्र वाऱ्यावर आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी पदाचा प्रभारसुद्धा दुसऱ्या डॉक्टरला दिला नसल्याने डॉक्टरविना दवाखाना अशी अवस्था झाली आहे.

मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीबरोबरच औषधनिर्माण अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, परिचर यासारखे अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदामुळे रुग्णांना आजारातून बरे करणारे मार्डी येथील प्राथमिक केंद्रच आजारी पडल्याचे दिसून येत आहे.  
मार्डी प्रा आरोग्य केंद्रात डॉक्टर रजेवर, रुग्ण वाऱ्यावर; ओपीडी पुरते तात्पुरत्या डॉक्टर ची सोय मार्डी प्रा आरोग्य केंद्रात डॉक्टर रजेवर, रुग्ण वाऱ्यावर; ओपीडी पुरते तात्पुरत्या डॉक्टर ची सोय Reviewed by सह्याद्री चौफेर on February 14, 2022 Rating: 5
Powered by Blogger.