सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्यच्या मागणी साठी येत्या २८फेब्रुवारीला अधिवेशनाच्या आरंभीच नागपूरच्या व्हेरायटी चाैकात मानवी श्रूंखला करुन आंदाेलनाचा बिगुल फुंकणार आहे.
त्या नंतर याच प्रमुख मागणीसाठी संसदेच्या अर्थसंकल्पीय काळात दि.७ एफ्रिल २०२२ ला जंतर मंतर वरुन संसदेवर हल्लाबाेल करण्यांची घोषणा करण्यात येणार आहे. अशी माहिती काल रविवार दि.१३ फेब्रूवारीला चंद्रपूरात पार पडलेल्या पत्रकार परिषेदेत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार वानमराव चटप यांनी दिली.
दरम्यान या आयोजित पत्रकार परिषदेला प्रकाश पाेहरे, अरुण केदार, एड.माेरेश्वर टेंभूर्डे, प्रभाकर काेंडबत्तुनवार, रंजना मामर्डे या शिवाय डॉ गजभे, मुकेश मासुरकर, किशाेर दहेकर, सुदामा राठौड़ आदींची प्रामुख्याने उपस्थिती हाेती.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी गेल्या ११५ वर्षांपासून लढा सुरु आहे.
स्वतंत्र विदर्भ मागणीसाठी नागपूरात हाेणार आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 14, 2022
Rating:
