वणी वरोरा मार्गावरील रस्त्यालगत असलेल्या काट्यावर वजन करण्याकरिता लागतात वाहनाच्या रांगा

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी वरोरा मार्गावरील रस्त्यालगत असलेल्या वजन काट्यावर वजन करण्याकरिता कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांच्या लागत असलेल्या रांगा वाहतुकीला अडथळे निर्माण करण्याबरोबरच अपघाताला निमंत्रण देत आहे. काट्याजवळील मुख्य मार्गाची अतिशय वाईट अवस्था झाली असून याठिकाणी कित्येक दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहेत. कोळसाखाणीतील रस्त्याप्रमाणे काट्याजवळील मुख्य मार्गाची अवस्था झाली आहे. या रस्त्यावर दुचाकी स्लिप होऊन कित्येक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. ट्रकांच्या सतत जाण्यायेण्याने हा रस्ता पांदण रस्त्यासारखा झाला असून डांबर रस्त्यावर मातीचे लहान लहान ढिगारे तयार झाले आहेत. या काट्यावर कोल वॉशरी मधून खाजगी रेल्वे साइडिंगवर कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांचे वजन केल्या जाते. कोल वॉशरीचे मुख्य व्यवस्थापकांना रस्त्यावरील मातीचे ढिगारे जेसीपी लावून काढण्यास सांगितले असता त्यांनी दिड महिन्यापूर्वी जेसीपीने रस्त्यावरील मातीचे ढिगारे काढले होते. परंतु आता आणखी पूर्वी प्रमाणेच काट्याजवळील रोडवर मातीचे ढिगारे तयार झाले असून काटा मालक कोणतीही खबरदारी घेतांना दिसत नाही. काट्याजवळील रस्त्यावर दुचाकी स्लिप होऊन नित्यनियमाने अपघात घडत आहे. पण काटा मालक मात्र काट्याजवळील रस्त्याची नित्यनियमाने निगा राखताना दिसत नाही. दररोज शेकडो ट्रक या काट्यावर वजन करतात. निळापूर येथील कोल वॉशरी सुरु झाल्यापासून कांटा मालकाला सुगीचे दिवस आले आहेत. काट्यावरील उत्पन्नातही भरभराट आली आहे. पण काट्यावरुन उत्पन्न मिळविण्यापलीकडे रस्त्याची व वाहतुकीची कोणत्याही प्रकारची दक्षता काटा मालक घेतांना दिसत नाही. मुख्य मार्गावर कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांच्या वजन करण्याकरिता लांबचलांब रांगा लागत असल्याने याठिकाणी नेहमी वाहतुकीची कोंडी होतांना दिसते. कोळशाचे वजन करण्याकरिता मुख्य मार्गावरच वाहनांची रांग लागून रहात असल्याने याठिकाणी नेहमी वाहतुकीचा जॅम लागतांना दिसतो. काटा करून साईडींगकडे वळण घेतांना दोन तीनदा ट्रकांना मागे पुढे करावे लागत असल्याने या काट्याजवळ मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काटा करण्याकरिता रस्त्यावर लागणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करतांना छोट्या वाहनधारकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. कोल वॉशरीतुन रेल्वे साईडींगवर कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांना आधी रोडवरील काटा करावा लागतो. ट्रक चालक टी-पॉईंट वरून बिनधास्त काट्याकडे वळण घेत असल्याने छोटे वाहनधारक अनियंत्रित होऊन त्यांच्या वाहनांना अपघात होतांना दिसतात. हा काटा अपघाताचे कारण ठरू लागला असून काटा व्यवस्थपणाच्या नियोजना अभावी मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. रहदारीच्या मुख्य मार्गावर वजन करण्याकरिता लागणाऱ्या ट्रकांच्या रांगा व काट्याजवळील रस्त्याची झालेली दयनीय अवस्था अपघाताचे कारण बनू पहात आहे. काटा मालकाने याची दक्षता घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
वणी वरोरा मार्गावरील रस्त्यालगत असलेल्या काट्यावर वजन करण्याकरिता लागतात वाहनाच्या रांगा वणी वरोरा मार्गावरील रस्त्यालगत असलेल्या काट्यावर वजन करण्याकरिता लागतात वाहनाच्या रांगा Reviewed by सह्याद्री चौफेर on February 13, 2022 Rating: 5
Powered by Blogger.