सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : आेैद्याेगिक नगरी म्हणून आेळखल्या जाणाऱ्या गडचांदूरच्या प्रभाग एक भागात असलेल्या हाय व्होल्टेजच्या विद्युत तारांना स्पर्श झाल्यामुळे पल्लवी शुभम पेंढारकर ह्या गर्भवती महिलेला शॉक बसला. त्यातच तीला आपला एक हात गमवावा लागला.
पल्लवीला एकदा नव्हे तर दोन वेळा शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. दरम्यान,शस्त्रक्रियाला येणारा खर्च व तिच्या घरची आर्थिक परिस्थिती बघता स्थानिक सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी सामजिक बांधिलकी जाेपासत या महिलेला नुकताच आर्थिक मदतीचा हात दिला.
या वेळी सदरहु महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मराज काळे, संजय गाडगे, महेंद्र ताकसांडे, प्रा. जहीर सैय्यद, लीलाधर मत्ते, सिताराम पिंपळशेंडे, गणपत आत्राम आदीं उपस्थित होते.
गर्भवती पल्लवी पेंढारकरला दिला शिक्षकांनी मदतीचा हात !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 13, 2022
Rating:
