देशमुखवाडी येथिल युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : शहरातील देशमुखवाडी परिसरातील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 9 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. युवकाचा एक  पाय हा दिवाणावर तर एक पाय हा लोंबकाळत होता. सदर युवक हा कार चालक असल्याचे समजते.

देशमुखवाडी येथे राहणारया  मनोज चकोर (वय अंदाजे 35) वर्ष या युवकाने राहत्या घरी गळफास लाऊन आत्महत्या केली. मृतक हा कार चालक असल्याचे समजते. स्कार्फ ने पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत कुटुंबीयांना तो आढळून आला. त्यानंतर त्याच्या मोठ्या भावाने पोलिस स्टेशनला घटनेबाबत माहिती दिली. पोलिस वृत्त लिहिस्तो वर  घटनास्थळी पोहचायचे आहेत. मृतक मनोज चकोर याच्या पाठीमागे पत्नी, मुलगा व आई असा आप्त परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असुन पोलिस तपासत ते निष्पन्न होईल. पुढील तपास पोलिस करित आहे.
देशमुखवाडी येथिल युवकाची गळफास घेऊन आत्महत्या देशमुखवाडी येथिल युवकाची गळफास घेऊन आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on February 09, 2022 Rating: 5
Powered by Blogger.