नांदेड खासदारांच्या मतदार संघात दिव्यांगाच्या विकासाठी दर वर्षी विस लाख निधी देण्याची तरतुद असतांना पाच फक्त लाख निधी उपलब्ध - चंपतराव डाकोरे पाटील यांनी केली खंत व्यक्त
सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
नांदेड : संसदेत अनेक कायदे सत्तेत गेलेले खासदार मंजुर केले जातात पण, तेच खासदार कायद्याची अंमलबजावणी दिनदुबळ्या जनतेसाठी केली जात नाही? अशी खंत चंपतराव डाकोरे पाटील यांनी व्यक्त केली.
दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसासारखे जीवन जगता यावे म्हणून शासन अनेक कायदे करून अमलात आणत आहे. मात्र, प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे अनेक दिव्यांग वंचित राहाव लागत असल्यामुळे भारत सरकारने २०१६ ला दिव्यांग कायदा संसदेत मांडला. तसेंच निवडणुकीदरम्यान जाहीर वचन देऊन तेच अंमलबजावणी करीत नसल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र व अनेक संघटनेने शासन प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. परंतु अद्याप न्याय मिळाला नाही.
विशेष म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मा.प्रतापराव पाटील यांना 'दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र' संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील व पदाधिकाऱ्यांनी निवडणूक मध्ये जाहिर पाठिंबा दिला. त्यावेळी जाहीरनामा पांठिबा पञक मध्ये दिव्यांग बांधवांसाठी असलेला खासदार निधी देण्याचे जाहीर अश्वासन चिखलीकर यांनी दिल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र जिल्हा नांदेड च्या वतीने गावोगावी जाऊन प्रचार केला व भरगोस बहुमताने सत्तेत पाठविले. मात्र, तिन वर्षाचा अनुशेष सहित दिव्यांग बांधवांचा खासदार निधी नियमाप्रमाणे दरवर्षी विस लाख रुपये प्रमाणे तिन वर्षाचा ६० लाख देण्याऐवजी फक्त ५ लाख रुपये निधी प्रशासनाकडे जमा केला आहे. त्या निधीतून दिव्यांगाना साहित्य देण्याची तरतूद केलेली आहे. ही तटपुंजी निधी असल्याचे डाकोरे पाटील यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगाना चालता येत नसल्यामुळे बॅटरीद्वारे तिन चाकी सायक़ल मिळावी म्हणून शेकडो दिव्यांगानी पडत झडत जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांच्या कडे अर्ज सादर केले असता त्याची प्रशासनाने छाननी करुन फक्त ७७ दिव्यांगाना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलाऊन त्यांच्या मुलाखती दि ८ फेब्रुवारी २०२२ ला घेण्यात आल्या.
जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगानी वाहन करून शेकडो रू खर्च करून कशाबशा मुलाखती दिल्या. त्यात फक्त दहा दिव्यांगाना पाच लाख रूपये निधीचा लाभ होईल? जर खासदार साहेबांनी नियमाप्रमाणे दर वर्षी विस लाख रुपये मागील तीन वर्षाचा अनुषेश सहित निधी दिला असता तर दिव्यांगाना त्यांचा हक्क मिळाला असता पण, संसदेत कायदे मंजुर करणारे सत्तेत गेलेले लोकप्रतिनिधीच कायद्याची अंमलबजावणी करीत नसल्याची खंत दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, राजु शेरकुरवार, ऊमेश भगत, माधवराव डोईफोडे, हानिफ शेख, बालाजी होनपारखे, रामजी गायकवाड, तानाजी कदम, बालाजी राठोड इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध पञकाद्वारे दिली.
नांदेड खासदारांच्या मतदार संघात दिव्यांगाच्या विकासाठी दर वर्षी विस लाख निधी देण्याची तरतुद असतांना पाच फक्त लाख निधी उपलब्ध - चंपतराव डाकोरे पाटील यांनी केली खंत व्यक्त
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 09, 2022
Rating:
