सन्मान स्त्री फाऊंडेशनच्या वतीने निंबाळा येथे माता रमाई जयंती साजरी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तालुक्यातील निंबाळा येथे सन्मान स्त्री फाऊंडेशनच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. रमाई जयंती निमित्त अभिवादन व स्नेहमिलन मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातून अभिवादन रॅली काढण्यात आली. गावातील सर्वच महिला पुरुष या रॅलीत सहभागी झाले होते. येथील सत्यशोधक समाजसुधारक सीताराम आसेकर यांना अभिवादन करून व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून एकविरा महिला बँकेच्या अध्यक्षा व सन्मान स्त्री शक्ती फॉऊंडेशनच्या किरणताई देरकर तर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मारेगाव येथील बालरोग तज्ञ डॉ. सपना केलोडे यांची उपस्थिती लाभली. तसेच प.स. माजी उपसभापती वृषाली खानझोडे, निंबाळयाच्या सरपंचा सविता ढेंगळे या प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वैशाली देठे, सुरेखा ढेंगळे, संगीता डाहुले, रुपाली पचारे उपस्थित होत्या. वृषाली खानझोडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. महापुरुषाची प्रेरणा झालेल्या माता रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन स्वतःमध्ये बदलाव करून स्वतःचा व समाजाचा आत्मविश्वास जागृत करावा, व सामाजिक बांधिलकी जपावी. जिजामाता व सावित्रीबाई यांना प्रेरणास्थानी ठेऊन समाजाला घडवण्याचं कार्य करावं असे मनोगत किरणताई देरकर यांनी यावेळी व्यक्त केले. 

रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून निंबाळा येथील आशा सेविका व सरपंचा याचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शिवसेनेचे प्रवीण खानझोडे याच्या कडून निंबाळा येथील तुकडोजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यांच्या सौंदर्यीकरणाकरिता आर्थिक मदत देण्यात आली. कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सन्मान स्त्री फाऊंडेशन निंबाळा येथिल सुनीताताई चिडे, सविता बिलबिले, मिरा मेश्राम, मंगला दुधकोहळे, सविता लसंते, सविता आसेकर, गीता आसेकर, यांनी परिश्रम घेतले.
सन्मान स्त्री फाऊंडेशनच्या वतीने निंबाळा येथे माता रमाई जयंती साजरी सन्मान स्त्री फाऊंडेशनच्या वतीने निंबाळा येथे माता रमाई जयंती साजरी Reviewed by सह्याद्री चौफेर on February 09, 2022 Rating: 5
Powered by Blogger.