सह्याद्री न्यूज | रवि घुमे
मारेगांव : मारेगा़व तालुक्यात आधार अर्जदारांना सोईस्कर व्हावे या करीता पोस्ट ऑफीस मधे नवीन आधार कार्ड काढणे,त्यावरील पत्ते बदलावीने, वयानुसार शाळकरी मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करणे इत्यादी कारणास्तव तालुक्यातील नागरीकांना सुविधा पुरविण्या करीता मारेगांव पोस्ट ऑफीसमध्ये आधार केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिली खरी,पण केंद्रात अनेक समस्यांचा डोंगर उभा आहे.तिथे तासनतास प्रमुख समस्या आहे ती सर्व्हर डाउन,नो नेटवर्क अर्थात लींक फेल,कधी कधी विजगूल ही कारणं नित्याचीच झाली आहे.
मारेगांव हाआदीवासी बहूल तालूका आहे, त्यामुळे सर्वच नागरिक शिक्षीत असेलच याची तिळमात्र हमी नाही. काही जेष्ठ नागरिक तर निरक्षर असल्यामुळे त्यांना आधार कार्ड चे महत्वच कळलं नाही किंबहुना कार्ड कसे व कुठून काढले जाते हा त्यांच्या पूढील मोठा पेच,पण जेव्हा आधारकार्ड विना शासकीय कामं अडताहेत हे पाहून ग्रामीण जनतेने आधार केंद्राकडे धाव घेतली खरी,पण आधार चा फार्म् भरतांना तो पुर्णपणे इंग्रजीत आणि तोही मोठ्याच (Capital) अक्षरात भरला पाहिजे व त्यात कुठेही खोडतोड व अधीलीखीत ( Overwriting) नसावी हा सरकारी नियम.यामुळे अर्जदारांची चांगलीच गोची होत आहे.
कोव्हीड निर्बंधांमुळे तिथेही गर्दी टाळण्यासाठी आठवड्यात सोमवारलाच नंबर लावायचा नी,त्यांना बोलावल्या तारखेला हजर व्हायचं,नी फार्म चुकला की परत पुण्हा येत्या सोमवारला पुन्हा नंबर लावायचा म्हण्जे "तारीख पे तारीख". त्यामुळे एकमेव असलेल्या महीला आधार ऑपरेटर वरच सर्वांचा रोष. सर्व्हर डाऊन, लिंक फेल असल्यावर कर्मचाऱ्यांना उपस्थितीत्यांचा रोष सहन करावा लागतो. सकाळी 11 वाजता आलेला अर्जदार,ज्येष्ठ नागरिक 3-4 वाजेपर्यंत रांगेत उभा राहून हताश होउन दुसऱ्या दिवशी परत येतो पण समस्या ही नित्याचीच. हा फार मोठा मनस्ताप होत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
एकीकडे केंद्र सरकार डिजिटल इंडिया होण्याच्या थापा मारतो आहे तर अगोदर नेटवर्क व्यवस्थित करा, मघ बघुया डिजिटल इंडिया.
निरक्षरांना फार्म भरुन देण्याची अतीरीक्त आधार केंद्राची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
मारेगांव येथे अतीरीक्त सरकारी आधार केंद्राची गरज
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 10, 2022
Rating:
