सह्याद्री न्यूज | रवि घुमे
मारेगाव : वनविभागाच्या हद्दीत येत असलेल्या नाल्यातून अवैधपणे रेतीचा उपसा करणारा ट्रॅक्टर केगाव बीट वनरक्षकांनी पकडला. ही कारवाई बारा वाजताच्या दरम्यान करण्यात आली.
मारेगाव तालुक्यातील वेगाव परिसरातील वनविभागाच्या हद्दीतील नाल्यामधुन अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टर वेगाव मार्गाने येत असल्याचे वन विभागाने गोपनीय माहिती च्या आधारे एम एच २९ ए डी ८२१६ या क्रमांकाचे ट्रॅक्टर, ट्रॉली आज (ता.२७) व चालक अमोल राजुरकर रा. डोंगरगाव तसेच मालक पवन जांभुळकर रा. वेगाव यांच्या मालकीहक्काचा ट्रॅक्टरमध्ये भरलेली लाल रंगाची रेती व उत्खननाची साधने वनविभागाने ताब्यात घेवून मारेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा केले आहेत.
वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे, वनपाल अशोक पोयाम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केगाव बीट वनरक्षक प्रेमिला सिडाम यांनी केली आहे.
अवैध रेती उपसा करणारा ट्रॅक्टर वनविभागाने केला जप्त
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 27, 2022
Rating:
