सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : वणी आगार येथे आज २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस असल्याने वणी आगार व्यवस्थापक सुमेध टिपले यांनी जेष्ट पत्रकार रमेश तांबे यांच्या हस्ते फित कापूस आगारात लावलेल्या बोर्डचे उद्घाटन केले.यावेळी वाहतूक निरीक्षक वसंत टेकाम, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक के.व्हि.सावळे, वाहतूक नियंत्रक एस.टी.शेरकी, वाहतूक नियंत्रक कपीले, बाबाराव कुळमेथे,व इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व प्रवाशांना मराठी भाषा दिनानिमित्त माहिती देण्यात आली.तसेच प्रवाशांना साखर, पेढे वाटून मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
वणी आगार येथे मराठी भाषा गौरव दीन साजरा करण्यात आला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 27, 2022
Rating:
