सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राेहन घुगे तसेच चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गाैंड यांचे मार्गदर्शनाखाली आज रविवार दि.२७ फेब्रुवारीला भल्या सकाळी गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर शहर लगतच्या दुर्गापूर पदमापूर मार्गावर अवैध रेतीचे वाहन मंडळ अधिकारी रमेश आवारी, महिला तलाठी प्रतिभा येरमे व रजनी मडावी यांनी पकडल्याचे वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून रेती माफियांनी अवैध रित्या महसुल पथकाची नजर चुकवून दिवस रात्र वाहनाव्दारे रेती चाेरुन नेण्याचा सपाटा लावला हाेता.या बाबतीत आता महसुल विभागाने चांगलीच कंबर कसली असून जिल्हाभर महसुल पथक आपल्या जिवाची पर्वा न करता अवैध गाैण खनिज वाहने पकडत आहे. दरम्यान, महसुल पथकातील महिला पटवारी देखिल आता अश्या रेती तस्कारांवर कारवाया करण्यास व त्यांची अवैध गाैण खनिजाची वाहने पकडण्यास महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचे एकंदरीत दिसून येते. आजच्या या महसूल पथकाच्या कारवाईमुळे या परिसरातील रेती माफियांचे अक्षरशा धाबे दणाणले आहे. सदरहु वाहन पकडल्याची माहिती लगेच प्रतिभा येरमे यांनी भ्रमनध्वनी तहसीलदार गाैंड यांना दिली असल्याचे समजते.महसुल पथकाच्या जाळ्यात अडकलेल्या अवैध रेती वाहनाचा जप्तीनामा मंडळ अधिकारी रमेश आवारी यांनी घटनास्थळी केला असून ते वाहन दंडात्मक कारवाईसाठी चंद्रपूर तहसील कार्यालयात जमा केले आहे.
या आधी काेरपना भागात महिला तलाठी रोशनी काेल्हे यांनी मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांचे मार्गदर्शनाखाली अवैध गाैण खनिजाचे वाहन पकडले असल्याचे सर्वश्रूतच आहे.
चंद्रपूर महसुल पथकाची धडक कारवाई
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 27, 2022
Rating:
