रेल्वे गेट बंद होत असतांनाही ट्रक शिरला आत, पण क्रॉसिंग वरील रेल्वे गेटच (बूम) फसला ट्रकच्या मधात

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रेलरने रेल्वे क्रॉसिंग वरील रेल्वे गेटला धडक दिल्याने एका बाजूचे रेल्वे गेट (बूम) वाकले असून रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. मालवाहू रेल्वे ही रेल्वे क्रॉसिंगवरून जाणार असल्याचे संकेत मिळताच गेटमन ने रेल्वे गेट बंद होण्याचा सायरन देऊन गेट बंद करत असतांनाच भरधाव ट्रकने क्रॉसिंग पार करण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वे गेट (बूम) ट्रकवरच पडल्याने कॅबिन व डाल्याच्या मधात फसून ते पूर्णतः वाकले. ट्रक चालकाने जॅक उचलून डाल्याच्या समोरील रिपमध्ये फासलेले गेट (बूम) काढण्याचा प्रयत्न केला असता ते आणखीच वाकले. त्यामुळे रेल्वे गेटचे मोठे नुकसान झाल्याने गेटमनने घटनेबाबत स्टेशन मास्टरला कळवून रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार केली आहे. आरपीएफ अजून घटनास्थळी पोहचायचे आहेत. आरपीएफ आल्यानंतर ट्रकवर कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात येते. पण कोळशाच्या ट्रिप मारण्याची चालकांमध्ये लागलेली ही स्पर्धा कधी कोणाच्या जीवावर बितेल व चालकांकडून कधी कोणते नुकसान होईल याची आता शाश्वतीच राहिलेली नाही. 

मुंगोली कोळसाखाणीतुन कोल वॉशरी येथे कोळशाची वाहतूक करणारा MH ४० CD ४९८४ हा ट्रक कोल वॉशरी येथे कोळसा खाली करून खदानीकडे जात असतांना रेल्वे गेटला धडकला. मालवाहू रेल्वे येणार असल्याने गेटमन रेल्वे गेट बंद करण्याचा सायरन देऊन गेट बंद करत असतांनाच या भरधाव ट्रकने रेल्वे गेट पार करण्याचा प्रयत्न केला. पण एका बाजूचे बूम ट्रकवरच आदळले. कॅबिन व डाल्याच्या मधात बूम फसल्याने ते पूर्णतः वाकले. चालकाने जॅक उचलून डाल्याच्या समोरील रिप मधून बूम काढण्याचा प्रयत्न केला असता बूम आणखीच वाकले. गेटमनने ट्रकला बाजूला करून स्टेशन मास्टरला घटनेबाबत माहिती दिली. तसेच रेल्वे पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. रेल्वे पोलिस घटनास्थळी आल्यानंतरच ट्रकवर व चालकावर काय कार्यवाही होईल हे स्पष्ट होणार आहे. आज १२ फेब्रुवारीला दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कोळसाखाणी मधून कोळशाच्या जास्तीत जास्त चकरा लागाव्या याकरिता वाहतूकदार चालकांना ट्रिप नुसार बोनस देऊन त्यांच्यात ट्रिप मरण्याची स्पर्धा निर्माण करित आहे. पैशाच्या लालसेपायी जास्तीतजास्त चकरा मारण्याकरिता चालक सुसाट वाहने चालवितात. त्यामुळे त्यांच्या हातून मोठ्या दुर्घटना होऊ लागल्या आहेत. कोळसाखाणीतून कोळशाच्या चकरा मारण्याची ट्रक चालकांमध्ये निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा कधी कोणाच्या जीवावर बितेल याची आता शास्वतीच राहिलेली नाही. त्यामुळे अनियंत्रित वाहतुकीला व गाडीच्या वेगाला आळा बसावा याकरिता ट्रक चालकांमध्ये कायद्याचा वचक निर्माण करणे गरजेचे झाले आहे.
रेल्वे गेट बंद होत असतांनाही ट्रक शिरला आत, पण क्रॉसिंग वरील रेल्वे गेटच (बूम) फसला ट्रकच्या मधात रेल्वे गेट बंद होत असतांनाही ट्रक शिरला आत, पण क्रॉसिंग वरील रेल्वे गेटच (बूम) फसला ट्रकच्या मधात Reviewed by सह्याद्री चौफेर on February 12, 2022 Rating: 5
Powered by Blogger.