चिखलगाव येथील अल्पवयीन मुलीने घेतला गळफास, तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी लगत असलेल्या चिखलगाव येथील एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १२ फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास घडली. मुलगी ही आई व मोठ्या भावासोबत आजी आजोबाकडे वास्तव्याला होती. कुटुंबातील सदस्य घराबाहेर गेल्याची संधी साधून या मुलीने गळफास घेतला. सायंकाळी भाऊ घरी आल्यानंतर त्याला बहीण घराच्या आड्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. काही महिन्यांपूर्वी गावातीलच एका तरुणाने तिच्याशी प्रेम संबंध प्रस्थापीत करुन तिचे शारिरीक शोषण केल्याची तक्रार तिने पोलिस स्टेशनला नोंदविली होती. तिच्या तक्रारी वरुन पोलिसांनी आरोपीला अटकही केली होती. पण आज या अल्पवयीन मुलीनेच आत्महत्या करुन जगाचा निरोप घेतला. तिने आत्महत्या केल्याची महीती पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे.

चिखलगाव येथे आई व मोठ्या भावासोबत आजी आजोबाच्या घरी वास्तव्याला असलेल्या आचल ठावरी या अल्पवयीन मुलीने घरी कुणी नसतांना घराच्या आड्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली. मुलीला वडील नसल्याने ती आपल्या परिवारासह आजी आजोबाकडे रहात होती. भाऊ घरी आल्यानंतर त्याला घराचा दरवाजा बंद दिसला. त्याने दार ठोठावले असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने खिडकीतून डोकावून बघतले, तर त्याला बहीण घराच्या आड्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडून तिला ग्रामीण रुग्णालयात आणले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तालुक्यात आत्महत्यांचं सत्रच सुरु झालं असून जीवन नकोसं झाल्यागत नागरिक आत्महत्या करीत आहेत. नैराश्यातून आत्महत्या करण्याचं प्रमाण आता चांगलंच वाढलं आहे. विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या या मुलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकले नाही. पण तिच्या अशा या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ केल्या जात आहे. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली असून पोलिस तिच्या आत्महत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.
चिखलगाव येथील अल्पवयीन मुलीने घेतला गळफास, तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच चिखलगाव येथील अल्पवयीन मुलीने घेतला गळफास, तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच Reviewed by सह्याद्री चौफेर on February 12, 2022 Rating: 5
Powered by Blogger.