५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, नराधमाला केली अटक

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : तालुक्यात दिवसेंदिवस आत्महत्या आणि बलात्काराच्या घटनेत वाढ होत आहे. अशातच मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या किन्हाळा येथे एका पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

पिडीत बालिका एकटीच असल्याची खात्री करुन तिला डान्स शिकवतो म्हणून जाळ्यात ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची गुरुवार (ता.१० फेब्रु.) ला सर्व आप बिती चिमुकलीने आई, वडीलांना सांगितली. पीडितेला वणी येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, ही धक्कादायक बाब उघडकीस आली.

घडलेल्या प्रकाराची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांना दिल्यावर त्यांनी रूग्णालयात जावून सदर घटनेची तपासणी केली. त्यानंतर या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना देण्यात आली. त्या नुसार निलेश राजू टोंगे (२६) या नराधमाला मारेगाव पोलिसांनी अटक केली. 



५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, नराधमाला केली अटक ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, नराधमाला केली अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on February 12, 2022 Rating: 5
Powered by Blogger.