मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस ३ वर्षाची शिक्षा

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : टाकळखेडा येथे १६ जुलै २०१८ रोजी गंभीर मारहाण केल्याप्रकरणी आरोपी कवडू वाघाडे यास यांना प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एन. पी. वासाडे यांनी तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, घातक हत्यार वापरल्याने एक वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

तालुक्यातील टाकळखेडा येथे १६ जुलै २०१८ ला दुपारी १ वाजता फिर्यादी व त्याचा सोबती हे टाकळखेडा येथील पडित शेतात शेळ्या चराई असतांना आरोपीने "तुम्ही येथे शेळ्या का चारता" असे म्हणून फिर्यादीसह त्याच्या सहकाऱ्याला काठीने मारहाण केल्याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ गंभीर इजा केली व सोबतच्या सहकाऱ्याला दोन्ही हातांवर काठीने मारहाण करून जखमी करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मारेगाव न्यायालयात दाखल खटल्याच्या सुनावणीत गुन्हा सिद्ध झाल्याने ८ फेब्रुवारी रोज मंगळवार रोजी आरोपीला मारेगाव न्यायालयाने शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सहायक सरकारी वकील चैताली एस. खांडरे यांनी काम पहिले.

न्यायालय पैरवी जमादार ढुमणे यांनी सहकार्य केले.


मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस ३ वर्षाची शिक्षा मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस ३ वर्षाची शिक्षा Reviewed by सह्याद्री चौफेर on February 13, 2022 Rating: 5
Powered by Blogger.