मुर्धोनी येथिल संत रविदास महाराजांच्या तैलचित्राचे सौंदर्यीकरण होणार, जी.प. सदस्य संघदीप भगत यांनी उपलब्ध करून दिला विकास निधी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तालुक्यातील मुर्धोनी येथिल संत रविदास महाराज चौकातील संत रविदास महाराज याच्या तैलचित्र सौंदर्यीकरणाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी व मुर्धोनी शाखेने पुढाकार घेऊन रविदास महाराजांच्या तैलचित्र सौंदर्यीकरणाचा प्रश्न मार्गी लावला असून जी.प. सदस्य संघदीप भगत यांच्या स्थानिक विकास निधीतून तैलचित्राचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. नुकताच मुर्धोनी येथिल संत रविदास महाराज चौकात त्यांच्या तैलचित्र सौंदर्यीकरणाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. जी.प. सदस्य संघदीप भगत यांच्या हस्ते तैलचित्र सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रशांत भोज होते. तर प्रमुख अथिती म्हणून तंटामुक्ती समितीचे तुकाराम निबोट, राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी चे अध्यक्ष रविंद्र धुळे, जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बांगडे, उपसरपंच साईनाथ तोडासे, पोलिस पाटील रामकृष्ण धोटे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश धुळे, समाजाचे जेष्ठ सदस्य संभाजी डुबे, महादेव डुबे, रमेश नवले मुरधोनी शाखा अध्यक्ष अमोल डुबे, सदस्य महेश डुबे, किसन कोराडे, श्याम गिरडकर उपस्थित होते. संत रविदास महाराज यांच्या तैलचित्राच्या सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याने अमोल डुबे यांनी संत रविदास महाराज यांची मूर्ती भेट देण्याची घोषणा यावेळी केली. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्हा अर्बन बँकेच्या वणी शाखे तर्फे मुर्धोनी शाखेला २५ खुर्च्या भेट देण्याचीही यावेळी घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन रविंद्र धुळे यांनी केले. कार्यक्रमाला समाज बांधव व ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुर्धोनी येथिल संत रविदास महाराजांच्या तैलचित्राचे सौंदर्यीकरण होणार, जी.प. सदस्य संघदीप भगत यांनी उपलब्ध करून दिला विकास निधी मुर्धोनी येथिल संत रविदास महाराजांच्या तैलचित्राचे सौंदर्यीकरण होणार, जी.प. सदस्य संघदीप भगत यांनी उपलब्ध करून दिला विकास निधी Reviewed by सह्याद्री चौफेर on February 12, 2022 Rating: 5
Powered by Blogger.