सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्याने मुलामुलींच्या तीन गटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. भंडारा येथे या क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यवतमाळ जिल्हातील १९ वर्ष वयोगटातील मुलामुलींचे दोन व १४ वर्ष वयोगटातील मुलाच्या एका संघाने या स्पर्धेत भाग घेतला. जिल्ह्याच्या तीनही क्रिकेट संघातील खेळाडूंनी अप्रतिम व आपल्या लौकिकाला साजेसा खेळ खेळत तीनही गटात द्वितीय क्रमांक पटकावला. यवतमाळ जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिव गौतम जिवने यांच योग्य मार्गदर्शन व जी.पी. टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रितेश लोणारे यांनी दिलेलं प्रशिक्षण तीनही गटातील खेळाडूंच्या संघाला विजयी करण्यात मोलाचं ठरलं. या दोघांनी तीनही वयोगटातील खेळाडूंमध्ये जिंकण्याची जिद्द निर्माण केली, व खेळाडूंनी सांघिक खेळ करीत क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावलं. १९ वर्ष वयोगटातील मुलामुलींच्या दोन संघाने व १४ वर्ष वयोगटातील मुलाच्या एका संघाने या स्पर्धेत द्वितीय स्थान मिळविलं आहे. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कोच, मॅनेजर व सहकाऱ्यांनी खेळाडूंमध्ये विजयाची ऊर्जा निर्माण केली. तसेच जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे शाहिद शेख, सुरज गालेवार, गणेश वाघाडे, शितल सोनटक्के, नयन कुचनकर, हिमांशू वाणी, ग्रीष्मा पेंदाने, अमोल पारेलवार यांनी खेळाडूंचे मनोबल वाढविण्याकरिता मोठे परिश्रम घेतले. गौतम जिवने व प्रितेश लोणारे या क्रिकेट असोसिएशनच्या दोन्ही सचिवांनी खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले, व भविष्यातील त्यांच्या यशस्वी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.