यवतमाळच्या ९ हुशार मुस्लिम विद्यार्थ्यांची एम बी बी एस साठी निवड


सह्याद्री न्यूज | रुस्तम शेख 

यवतमाळ : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नीट ची परीक्षा अत्यंत महत्वाची असते नीट ची ही परीक्षा नुकतीच पार पडली या नीट परीक्षेत यवतमाळ येथून नऊ हुशार मुस्लिम विद्यार्थ्यांनी शीर्ष क्रमांक पटकावून मुस्लिम समाजाचे तसेच यवतमाळ शहराचे व संपूर्ण जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे ही मुस्लिम समाज आणि यवतमाळकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

यात कु.सारा अशफाक खान हिची निवड इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नागपूर येथे झाली. हसन पटेल मकसूद पटेल याची निवड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे झाली. कु.शाफिया हारून शेख हिची निवड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे झाले. कु.नबा फातिमा इम्रान शेख हिची निवड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,चंद्रपूर येथे झाली. तबिश वासिक अली दारवाह,याची निवड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे झाली.वसीम सिद्दीकी रशीद सिद्दीकी याची निवड मेडिकल कॉलेज नाशिक येथे झाली. अबू तल्हा हाफिज माजिद याची निवड मेडिकल कॉलेज जळगाव येथे झाली. सकलैन खालिक शेख याची निवड डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती येथे झाली. तसेच सय्यद उमेर अली जफर अली कलंब याची निवड वैद्यकीय महाविद्यालय बदनापूर,जालना येथे झाली असून मुस्लिम समाजाच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांसाठी ईश्वराकडून प्रार्थना केली जात आहे की अल्लाह सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांना हे यश आशीर्वाद देईल. मुस्लिम समाजाला आणि या शहराला एक चांगला आणि सद्गुणी डॉक्टरांचा आशीर्वाद लाभेल ही प्रार्थना केली जात आहे.
यवतमाळच्या ९ हुशार मुस्लिम विद्यार्थ्यांची एम बी बी एस साठी निवड यवतमाळच्या ९ हुशार मुस्लिम विद्यार्थ्यांची एम बी बी एस साठी निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on February 17, 2022 Rating: 5
Powered by Blogger.