हटवांजरी (पोड) येथील गावाकऱ्यांनी दिले मारेगाव तहसील कार्यालयाला निवेदन


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील हटवांजरी (पोड) येथील गावाकऱ्यांनी एका शेतकऱ्यांकडून अडथळा निर्माण केला जात असल्याने रस्त्याचे बंद पडलेले काम सुरु करण्यासंदर्भात व डीलर वर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन मारेगाव तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख कार्यालयाला देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले की, मौजा हटवांजरी व हटवांजरी ते हटवांजरी (पोड) कडे जाणारा डांबरीकरण मंजूर रस्ता चे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा यांचेकडून काम पूर्ण करण्यात येत आहे. परंतु या रस्त्यालगत असलेले 1,2,3,4 चे शेतजमीनदाराकडून वारंवार शेत मोजणीचे कारण देत बांधकामात अडथळा निर्माण करीत असल्याचे गावाकऱ्यांचे म्हणणे आहे. ३० ते ४० वर्षांपासून वहीवाट असलेल्या रस्त्यावरून हटवांजरी पोडावरील आम्ही ग्रामस्थ येणे जाणे करीत आहे. सदर रस्त्याशिवाय आम्हा गावाकऱ्यांना येण्या जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही. त्यामुळे गैर अर्जदार यांचेकडून वारंवार एकच कारण देत कामात अडथळा निर्माण केल्या जात असल्याने संबंधित विभागाने हा अडथळा दूर करून सदर रस्त्याचे बांधकाम सुरु करण्यात यावे. तसेच हटवांजरी पोड वासियांचे या डीलर करून राशन बंद करण्याची भाषा केली जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे त्याचे वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रमोद मेश्राम, बापूजी कुमरे, संदीप आत्राम, सुनील टेकाम, सुरेश आत्राम, गणेश आत्राम, सुभाष आत्राम, दिनेश आत्राम, दादाजी आत्राम, राजू मेश्राम, पांडुरंग आत्राम, पोटू तुमराम, परसराम ठक, राजू पारखी, मारोती आत्राम यांनी केली आहे.
हटवांजरी (पोड) येथील गावाकऱ्यांनी दिले मारेगाव तहसील कार्यालयाला निवेदन हटवांजरी (पोड) येथील गावाकऱ्यांनी दिले मारेगाव तहसील कार्यालयाला निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on February 18, 2022 Rating: 5
Powered by Blogger.