खांदला येथे शिव जयंती महोस्तवाच आयोजन, जाहिर व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त खांदला येथे शिव जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिव महोस्तव समितीच्या वतीने आयोजित या शिव जयंती महोस्तवात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व जाहिर व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मुलुख मैदानी तोफ म्हणून जन विख्यात असलेले सोलापुर येथिल व्याख्यानकार खंडु पाटिल डोईफोडे यांच लोककल्याणकारी राजा शिव छत्रपती व आजचा महाराष्ट्र या विषयावर व्याख्यान होणार आहे. खांदला येथिल जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात 20 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता हा व्याख्यानाचा कार्यक्रम होणार असुन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ जी.प. सदस्य परसराम पेंदोर, नामदेव कृषी केंद्राचे संचालक रविंद्र मासिरकर, साखरा चे सरपंच निलेश पिंपळकर, गोवारी (पा.) येथिल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र इद्दे, सरपंच विट्ठल बोंडे (शिंदोला), सरपंच गणेश जेनेकर (कोलगाव), सरपंच जगदीश बोरपे (शिरपूर), उपसरपंच प्रफुल बोथाडे (खांदला), पोलिस पाटिल संतोष वासेकर (खांदला), तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शालिक पत्रकार (खांदला), खांदला ग्रा.प. सदस्य गणेश जुमनाके, सुनिता आसुटकर, वर्षा पावडे, रत्नमाला नवघरे, सुप्रिया गौरकर हे उपस्थीत राहणार आहेत.

स्वराज्यासाठी लढा देऊन रयतचे राज्य आणणारे शिवाजी महाराज मराठी मिलुखच नव्हे तर संपुर्ण विश्वाचे गौरव आहे. रूढींच्या गुलामीतून त्यांनी मानवजातीला मुक्त केले. रयतेचा राजा कसा असावा, याचा आदर्श त्यांनी जगासमोर ठेवला. त्यांच्या कतृत्वाची, शौर्याची व जनकल्याणाची सर्वांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्रासह संपुर्ण देशात शिव जयंती महोस्तवाच आयोजन करण्यात येतं. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शिव महोस्तव समिती खांदला च्या वतीने शिव जयंती महोस्तवाच आयोजन करण्यात आलं आहे.

या शिव जयंती महोस्तवाच्या यशस्वीतेकरिता समितीचे सर्वच सदस्य परिश्रम घेत आहेत.
खांदला येथे शिव जयंती महोस्तवाच आयोजन, जाहिर व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार खांदला येथे शिव जयंती महोस्तवाच आयोजन, जाहिर व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on February 18, 2022 Rating: 5
Powered by Blogger.