सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
शहरातील जैन स्थानकासमोर असलेल्या रमेश ट्रेडर्स या किराणा दुकानाला आज पहाटे अचानक आग लागली. हे किराणा दुकान रमेश पुण्यानी यांच्या मालकीचे होते. आगीत हे किराणा दुकान पूर्णतः जळून खाक झाले. दुकानात ठेवलेली मोपेड दुचाकीही आगीत जळाली. आग एवढी भीषण होती की, दुकानातील वस्तू व साहित्यांची जळून राख रांगोळी झाली. या आगीने आजूबाजूच्या घरांनाही धोका निर्माण झाला होता. आगीच्या ज्वाळा जवळपास असलेल्या घरांपर्यंत पोहचल्या होत्या. पण वेळीच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत रमेश पुण्यानी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सकाळी मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या नागरिकांना या दुकानातून धुर निघतांना दिसला. त्यानंतर ही माहिती दुकान मालकाला देण्यात आली. पण काही वेळातच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण दुकानालाच आपल्या कवेत घेतले.
अचानक लागलेल्या आगीत किराणा दुकान जळून खाक, दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 18, 2022
Rating:
