सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात माेडत असलेल्या कोरपना तालुक्यातील कोठोडा (बुजरुक) येथील पैनगंगा नदीच्या पात्रातुन एका रेती तस्करांने ग्रामस्थांना गावातील देवस्थान बांधकामासाठी रेती देण्यांचे आश्वासन देत, गावकऱ्यांचे संमतीने अवैध रेती नेण्यांचा सपाटा दिवस रात्र लावला हाेता. एव्हढेच नाही तर या तस्कराने एका ठिकाणी रेतीचा साठा (जमा) केल्याची बाब ग्रामस्थ व रेती तस्कर यांचेत काही कारणास्तव वाद निर्माण झाल्यामुळे उघडकीस आली असल्याचे नुकतेच प्राप्त झाले आहे. एवढ्या माेठ्या प्रमाणात रेती वाहतूक सुरू असतांना ही बाब काेणत्याही आजुबाजुच्या गावातील व्यक्तीने संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिली नाही या बाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. एरव्ही अवैध रेती वाहनांच्या बाबतीत तक्रारी करणारे ही या प्रकरणात गप्प कसे बसले हा प्रश्न साहजिकचं या निमित्ताने निर्माण झाला आहे. अधिक मिळालेल्या माहिती नुसार असे कळते की,गावकऱ्यांना हनुमान देवस्थान बांधकामासाठी रेती देण्याचा करार रेती तस्कर व गावक-यांत झाला हाेता. त्या अनुषंगाने रेती तस्करांने नदीघाटा जवळ जेसीबीने रस्ता तयार करून रेती वाहतुक आरंभ केली. कोठोडा बु येथील सरकारी स.न.72 परम्पोक या दगडी जमिनीवर अंदाजे 25 ट्रॅक्टर रेती साठा केल्याचे घटनास्थळी दिसून आले. संबधित विभागाला कुठलेली बाब माहित न हाेता रेती तस्करांने मध्यरात्री अवैध रेती वाहतूक केल्याचे बाेलल्या जाते.
दरम्यान गावकऱ्यातील गटबाजी मूळे एक दिवस रात्री रेती वाहतुकीसाठी मज्जाव केल्याने रेती वाहतूकदारात व काही गावकरी मंडळीत वादावादी झाली. ही वादावादी नंतर विकोपाला गेली. सध्या हे प्रकरण काेरपना पोलीस स्टेशन पर्यंत पाेहचल्याचे खात्रीलायक वृत्त असून,पाेलिस निरीक्षक यांनी ही माहिती काेरपनाचे तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांना दिली आहे. तहसीलदार कोरपना यांनी तात्काळ मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे व तलाठी विरेन्द्र मडावी यांना उपरोक्त प्रकरणात चाैकशी करण्याचे आदेश दिले. याच आदेशाच्या अनुषंगाने मंडळ अधिकारी व पटवारी यांनी घटनास्थळाला भेट देवून वरील रेती साठा जप्त करुन ताे आज (शुक्रवारला) काेरपना तहसील कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी जमा केला असल्याचे कळते.
या वेळी तहसील कार्यालयाचे अव्वल कारकुन राजेश माकाेडे, सुरेश नागासे व संजय कुळमेथे उपस्थित हाेते. हे वृत्त लिहीपर्यंत या घटनेतील खरा रेती तस्कर काेण? याचा शाेध लागला नव्हता परंतु या भागातील गावकरी मंडळीना खाेटे आश्वासन व आमिष देवून माेठ्या प्रमाणात या रेती तस्कराने अवैध रेती वाहतुक केल्याची चर्चा या परिसरात सुरु आहे.
मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे व पटवारी विरेन्द्र मडावींने केला काेरपना भागात अवैध रेतीचा साठा जप्त !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 18, 2022
Rating:
