सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी : आश्रमशाळा माथार्जुन येथे ४० आदिवासी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. मा प्रकल्प अधिकारी यांच्या पुढाकाराने प्रकल्पातील सर्व आश्रमशाळेवर एकाच दिवशी आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत जात प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्धार मा प्रकल्प अधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केला होता,त्या अनुषंगाने आश्रमशाळा माथार्जुन येथील मुख्याध्यापक,शिक्षक यानि पालकांशी संपर्क साधून,घरोघरी जाऊन आवश्यक प्रमाणपत्र गोळा करून जवळपास ४० प्रस्ताव दाखल केले आणि अगदी ३ ते ४ दिवसात जात प्रमाणपत्रे तयार झालित यासाठी झरी तहसील चे तहसीलदार यांनी कर्मचाऱ्यांना विशेष आदेश देऊन अगदी कमी कालावधीत काम पूर्ण करून घेतले,विशेष म्हणजे पालकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क पालकांना भरावे लागले नाही, झेरॉक्स (xerox) सुद्धा आश्रम शाळेकडूनच काढून दिल्या गेल्या अत्यंत कमी कालावधीत पूर्णपणे मोफत जात प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना मिळाली याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून याचे परिसरात विशेष कौतुक होत आहे.
या साठी प्रभारी मुख्याध्यापक श्री सोनोने,शिक्षक श्री नागोसे,क्रीडाशिक्षक श्री साजिद सर,संगणक शिक्षक श्री भिवरकर ,शिपाई श्री मारोती सीदाम चोकीदार महेश परचाके यांनी विशेष मेहनत घेतली.