उपराजधानी नागपूरात आज संताजी ब्रिगेड तेली महासभाच्या वतीने भव्य महिला मेळावा व रक्तदान शिबिराचे आयाेजन
सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
नागपूर : नागपूरातील संताजी ब्रिगेड तेली महासभा वतीने शनिवार दि. २६फेब्रुवारीला दुपारी १ वाजता स्थानिक जवाहर विध्यार्थी गृहात भव्य (नंदनवन पाण्याच्या टाकीजवळ) महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या मेळाव्याच्या निमित्ताने पथनाट्य, रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीराचे देखिल आयोजन करण्यात आले आहे. सदरहु मेळाव्याचे उद्घाटन ए.आय.सी.सी.नँशनल काे.- ऑर्डीनेटर प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्षा (आेबीसी) संगिताताई तलमले यांचे शुभ हस्ते हाेत आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रमेशजी गिरडे हे विभूषित करणार आहे. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री तथा वि.प.आमदार चंद्रशेखर बावणकुळे, पूर्व नागपूरचे आमदार क्रूष्णाजी खापर्डे, वि.प. आमदार अभिजीत वंजारी, माजी महापाैर शेखर सावरबांधे, कामठीचे आमदार टेकचंदजी साखरकर, उद्याेजक व समाजसेवक राकेश भावळकर उपस्थित राहणार असल्याची माहिती संताजी ब्रिगेड तेली महासभा संस्थापक व सचिव अजय धाेपटे यांनी काल नागपुर मुक्कामी दिली.
उपराेक्त कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय हटवार, सहसचिव हितेश बावनकुळे, कोषाध्यक्ष रुपेश तेलमासरे, गजानन तळवेकर, मंगेश साखरकर, कुमार बावनकर आदीं अथक परिश्रम घेत आहे.
उपराजधानी नागपूरात आज संताजी ब्रिगेड तेली महासभाच्या वतीने भव्य महिला मेळावा व रक्तदान शिबिराचे आयाेजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 26, 2022
Rating:
