टॉप बातम्या

खैरी येथे भीमराव घोडाम यांचा खून

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख

कळंब : तालुक्यातील खैरी येथे अज्ञात इसमांनी भीमराव सोनबा घोडाम वय ६५ वर्ष यांचा खून केल्याची घटना घडली .

 सविस्तर वृत्त असे की खैरी येथील रहिवासी भीमराव सोनबा घोडाम तलावावर चौकीदार म्हणून काम करीत होता. आज रोजी तलावाजवळ भीमराव घोडाम यांचा खून झाल्याची माहिती मृतक यांच्या भावाला मिळाली असता मृतकाची पत्नी रुकमा भीमराव घोडाम यांनी कळंब पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली.

माहिती मिळताच लगेच पोलीस स्टेशनचे ठाणेदार घटना स्थळी पोहचले व तपास करून मृतकला पोस्टमार्टम करिता ग्रामीण रुग्णालय कळंब येथे आणण्यात आले.
मुख्य आरोपी अजून पर्यंत सिद्ध न झाल्याने सदर खून हे अज्ञात इसमाने केला असल्याची माहिती पोलिस स्टेशन मधून मिळाली.

कळंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदशनाखाली आरोपीचा शोध घेणे सुरु आहे.

Previous Post Next Post