लाईमस्टोनची वाहतूक करणारा ट्रक स्वतः जिल्हाधिकारी यांनी पकडला, चालकाकडे रॉयल्टी नसल्याने केली कार्यवाही
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
तालुक्यातील गौराळा व वांजरी येथील लाईमस्टोनच्या खाणीतुन मुकुटबन सिमेंट कंपनी मध्ये मोठ्या प्रमाणात लाईमस्टोन पाठविला जातो. दररोज अनेक ट्रक लाईमस्टोनची वाहतूक करतात. खाणीतून ट्रकांमध्ये लाईमस्टोन भरल्यानंतर ट्रक चालकाकडे वजन पावती, बिलटी व रॉयल्टी देऊनच लाईमस्टोनची वाहतूक केली जाते. परंतु काही खाण मालक चलाखी करून एकाच रॉयल्टीवर अनेकदा किंवा विना रॉयल्टी गौण खनिजाची वाहतूक करित असल्याचे बरेचदा समोर आले आहे. त्यामुळे शासनाच्या खनिज निधीवर मोठा परिणाम होत असून परस्पर खनिज संपत्तीची विल्हेवाट लावली जात असल्याने शासनाला खनिज निधी पासून मुकावे लागत आहे. खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना दर चक्कर रॉयल्टी देण्याचा नियम असतांना एकाच रॉयल्टीवर सारख्या वजनाच्या वजन पावत्या देऊन एकापेक्षा जास्त चक्कर मारण्याची खान मालकांकडून चलाखी केली जात आहे. यात शासनाची मोठी फसवणूक होत आहे. तसेच पासिंग क्षमतेपेक्षा जास्त (ओव्हरलोड) लाईमस्टोन ट्रकांमध्ये भरून वाहतूक केली जात आहे. अनेक वर्षांपासून खनिजाची सर्रास ओव्हरलोड वाहतूक सुरु असतांनाही वाहतूक विभाग व आरटीओ याकडे लक्ष द्यायला तयार नाही. ओव्हरलोड वाहनांवर कार्यवाहीच होत नसल्याने वाहतूकदारांना भीती राहिलेली नाही. बिनधास्त ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. काही वाहनांच्या तर कागदपत्रांचीही मुद्दत संपलेली आहे. इन्शुरन्स, टॅक्स व फिटनेसची मुद्दत संपलेलीही वाहने सिमेंट कंपनीमध्ये लाइमस्टोनची वाहतूक करीत आहे. काही वाहतूकदारांनी तर स्कॅनिंग करून इन्शुरन्स,फिटनेस व टॅक्स च्या तारखा वाढविल्या आहेत. हात चलाखी करून खाण मालक व वाहतूकदारही शासन प्रशासाची फसवणूक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तरीही प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व वाहतूक विभागाची कोणत्याही प्रकारची कार्यवाही पाहायला मिळत नाही. यावरून मासिक परंपरा अजूनही सुरु असल्याची शंका येत आहे.
तालुक्यातील वांजरी येथील लाईमस्टोन खदाणीतून मुकुटबन येथील सिमेंट कंपनीत लाईमस्टोनची वाहतूक करणाऱ्या MH ४० CD ४७२५ या ट्रकला काल १५ फेब्रुवारीला रात्री स्वतः जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ट्रक चालकाजवळ लाईमस्टोनची रॉयल्टी नसल्याचे समजते. लाईमस्टोनच्या खाणींमधून सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंतच गाड्या भरल्या जात असून मुकुटबन सिमेंट कंपनीत रात्री लाईमस्टोन खाली केला जात नाही. हा ट्रक रात्री ८ वाजताच्या सुमारास मुकुटबन सिमेंट कंपनीत लाईमस्टोन खाली करण्याकरिता जात असतांना जिल्हाधिकारी यांनी पकडला. लाईमस्टोन वाहतुकीची रॉयल्टी नसलेला हा ट्रक जिल्हाधिकारी यांनी पोलिसांच्या ताब्यात दिला. ट्रकांमध्ये पासिंग क्षमतेपेक्षा जास्त खनिज भरून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे आता या ट्रकवर कोणत्या प्रकारची कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लाईमस्टोनची वाहतूक करणारा ट्रक स्वतः जिल्हाधिकारी यांनी पकडला, चालकाकडे रॉयल्टी नसल्याने केली कार्यवाही
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 16, 2022
Rating:
