कोळसा तस्करीतील आठही आरोपींची तुरुंगात रवानगी, पण त्यांचा करवता धनी कोन, हे मात्र गुलदस्त्यातच राहीले!
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : कोळसा तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आज १६ फेब्रुवारीला पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आठही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी आठही आरोपींना तुरुंगवासात पाठविले. ९ फेब्रुवारीला मध्यरात्री उकणी कोळसाखाणीतून कोळशाची तस्करी करतांना सात तस्करांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून चोरीचा कोळसा भरलेल्या दोन ट्रकांसह सात तस्करांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी सातही आरोपींची कसून चौकशी करत कोळसा चोरीत सहभागी असलेल्या आणखी एका आरोपीला अटक केली. आठही आरोपींना १६ फेब्रुवारी पर्यंत पीसीआर देण्यात आला होता. त्यांची आज पीसीआर ची मुद्दत संपल्याने त्यांना यवतमाळ जिल्हा तुरुंगात रवाना करण्यात आले. चोरीचा कोळसा भरून आणणारे ट्रक हे यवतमाळ येथील वाहतूकदाराचे असल्याची माहिती समोर आली आहे. कोळसा तस्करीत आणखी किती जणांचा हात आहे, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. परंतू किती दिवसांपासून ही कोळसा तस्करी सुरु आहे, व चोरीचा कोळसा कुणाला विकला जात होता, याचा तपास होणेही गरजेचे आहे. यांचा करवता धनी कोण, हे देखील समोर येणे गरजेचे आहे. तपासाला योग्य दिशा मिळाल्यास कोळसा तस्करीतील मोठे मासेही गळाला लागतील. एमएसएफ जवानांवर ट्रक चढविण्याचा प्रयत्न या कोळसा तस्करांनी केला. त्यामुळे तस्करी करतांना तस्कर कोणत्या स्तराला जातील हे सांगताच येत नाही. दोन वर्षांपूर्वी कोळसा चोरीला आलेले उधाण एमएसएफ जवानांच्या तैनातीमुळे थंडावले होते. पण परत आता कोळसा चोरीचा बाजार गरम होतांना दिसत आहे. कोळशावर आधारित उद्योग बऱ्यापैकी सुरु झाल्याने कोळसाखाणींमध्ये कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांची रेलचेल वाढली आहे. याचाच फायदा कोळसा तस्करही घेऊ लागले आहेत. चोरट्या मार्गाने वाहने खाणीत नेऊन कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बरोबर भरून कुणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने बाहेर काढण्याचा तस्करांचा नियोजित डाव एमएसएफ जवानांनी उधळून लावला. कोळसा तस्करी करणाऱ्या सात तस्करांसह चोरीचा कोळसा भरलेले दोन ट्रक पकडून एमएसएफ जवानांनी कोळसा चोरीचा हा प्रकार उघडकीस आणला आहे.
खनिज संपत्तीनी नटलेल्या या वणी तालुक्यात खनिज संपत्तीची मोठ्या प्रमाणात लूट सुरु आहे. कोळसा व रेती तस्करीत येथिल तस्करांनी रेकॉर्ड केले आहे. प्रशासनाला जेवढा खनिज निधी मिळाला नसेल त्यापेक्षा कितीतरी जास्त तस्करांनी निधी जमविला आहे. कित्येक वर्षांपासून कोळसा चोरीचा हा काळा धंदा सुरु आहे. कोळसा चोरीतून कित्येक जण गब्बर झाले आहेत. कोळशाच्या काळ्या धंद्यातूनच कित्येक जण आज वाईट कॉलर झाले आहेत. कोळसा चोरी करतांना ज्यांनी वार बघितला नाही, ते आज नामवर झाले आहेत. कोळसा चोरीत ज्यांनी सिंग खुपसले, त्यांचे कधी बिंगच फुटले नाही. कधी जे रस्यावर पडलेला कोळसा वेचून बोरीत भरुन विकायचे, तेच कालांतराने कोळसा तस्करीचे बादशाह बनले. त्यांचा प्रत्येक वार कोळसा तस्करीवर होता. कोळसा तस्करीतूनच काहींना बाणा आला तर काही गब्बर झाले. पुर्वी पासुन चालत आलेली कोळसा तस्करी आजही सुरुच आहे. फक्त तस्करीचे ट्रेंड व मुखवटे बदलले. काही जण तस्करीतुन राजकारणात आले, तर काहींनी राजकारणातून तस्करी केली. कोळसा चोरीच्या या धंद्यात कोणीही कोणाची कास पकडली. वेळ काटा बघणाऱ्या वेकोली कर्मचाऱ्यांचे खास लक्ष ठेऊन तपासणी करणाऱ्यांना गवसणी घालण्यात आली. अशा प्रकारे हा कोळसा चोरीचा धंदा फळा फुलाला आला. कोळसा चोरीतून कंगालही मालामाल झाले. दुचाकी घेण्याची कुवत नसलेले आज महागडया गाड्यातून फ़िरतांना दिसतात. कोळसा तस्करीतुन जमविलेल्या काळ्या पैशातून त्यांनी काळ्या कोळशाशी निगडीतच व्यवसाय थाटले आहेत. त्यामूळे कोळसाखाणीतून कोळसा चोरी करण्याच्या नवनवीन तर्हा ते शोधत असतात. कोळसाखणींमध्ये एमएसएफ जवाण तैनात करण्यात आल्याने त्यांचे कोळसा चोरीचे मनसुबे उधळले जात आहे. पण कोळसा तस्करीचे त्यांचे किडे अधून मधून चुकचुकतच असतात. त्यामूळे तस्करीसाठी चुकचुकनारयाना बाहेर काढणे गरजेचे झाले आहे. मोहरे तर लाख मिळतील पण वजीर शोधणे गरजेचे झाले आहे. कोळसा तस्करीत अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींवर भादंवि च्या 307, 395, 353 अंतर्गत मोठ्या कलमा लावण्यात आल्या आहेत.
कोळसा तस्करीतील आठही आरोपींची तुरुंगात रवानगी, पण त्यांचा करवता धनी कोन, हे मात्र गुलदस्त्यातच राहीले!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 17, 2022
Rating:
